Home | Maharashtra | Mumbai | Tribute to Actress Sonali Bendre; MLA kadam's in controversy again

अभिनेत्री सोनाली बेंद्रेला वाहिली श्रद्धांजली; अामदार कदम पुन्हा वादात, साेशल मीडियावर 'धुलाई'

विशेष प्रतिनिधी | Update - Sep 08, 2018, 06:55 AM IST

सध्या कॅन्सरवर अमेरिकेत उपचार घेत असलेली हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला जिवंतपणीच श्रद्धांजली वाहणार

 • Tribute to Actress Sonali Bendre; MLA kadam's in controversy again

  मुंबई- सध्या कॅन्सरवर अमेरिकेत उपचार घेत असलेली हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला जिवंतपणीच श्रद्धांजली वाहणारे ट्विट करून वादग्रस्त भाजप आमदार राम कदम यांनी पुन्हा नवा वाद ओढवून घेतला. दरम्यान, महिलांविषयी बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी कदम यांच्याविराेधात घाटकाेपर व बार्शी पाेलिसात अदखलपात्र गुन्हे दाखल झाले.


  मुलींना पळवण्याबाबतच्या वक्तव्यावरून तापलेले वातावरण कदम यांनी माफी मागितल्यानंतर काहीसे निवळत असतानाच त्यांच्या या नव्या ट्विटमुळे सोशल मीडियावर पुन्हा कदमांची धुलाई सुरू झाली. चूक लक्षात येताच श्रद्धांजलीचे ट्विट मागे घेत कदम यांनी सोनाली यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करणारे नवे ट्विट केले.


  सोनाली बेंद्रे हिच्या प्रकृतीबाबत शुक्रवारी उलटसुलट बातम्या सोशल मीडियावर फिरत होत्या. कोणतीही खातरजमा न करता आमदार कदम यांनी चक्क सोनाली बेंद्रे हिच्या निधनाबद्दल श्रद्धांजलीचे टि‌्वट केले. याचे पुन्हा राज्यभर जोरदार पडसाद उमटले. या घोळामुळे अगोदरच अडचणीत असलेल्या कदमांची ‘बुडत्याचा पाया खोलात’ अशी अवस्था झाली.


  कदम यांच्यावर अदखलपात्र गुन्हा
  महिलांविषयी अवमानकारक वक्तव्याबद्दल कदमांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने लावून धरली आहे. आमदार विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महिला कार्यकर्त्यांनी घाटकोपर येथील चिरागनगर ठाण्याबाहेर तीन दिवसांपासून ठिय्या आंदोलन केले. अखेर घाटकोपर पोलीसांनी कलम ५०४ अन्वये अदखलपात्र गुन्हा दाखल केला.


  चंद्रकांत पाटील यांच्याकडून पाठराखण
  राम कदम यांची महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पाठराखण केली. मुंबई येथे रस्त्यांची पाहणी करण्यासाठी गेलेल्या पाटील यांना प्रसारमाध्यमांनी कदम यांच्याबाबत विचारले तेव्हा, “कदम यांनी माफी मागितली आहे. कदम यांनी यापूर्वी अनेक महिलांना मदत केली आहे. त्यांच्या एखाद्या वक्तव्यामुळे इतका गदारोळ करण्याची आवश्यकता नाही. हा विषय संपवला पाहिजे’, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Trending