आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माथेफिरूंनी पेट्रोल टाकून दुचाकीसह दुमजली घर जाळण्याचा केला प्रयत्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - दोन माथेफिरूंनी दुचाकीसह दुमजली घरावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याची घटना द्रौपदीनगरात रविवारी मध्यरात्री घडली. या घरात १४ दिवसांच्या बालकासह पाच जण झोपले असतानाही हा प्रयत्न झाल्याने कुटुंबीय हादरले. सुदैवाने धुरामुळे वेळीच जाग अाल्याने सर्वांचे प्राण वाचले असून ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. 


द्रौपदीनगरातील सुनंदा जालम चौधरी यांच्या घरी हा प्रकार घडला. रविवारी रात्री चौधरी कुटुंबीय झोपले असताना मध्यरात्री १२.१० ते १ वाजेदरम्यान विना क्रमांकाच्या दुचाकीवरून दोन माथेफिरू त्यांच्या घराबाहेर आले. त्यांनी सुरुवातीला घराबाहेर उभ्या असलेल्या दुचाकीवर (एमएच- १९, डीडी- ९८१४) पेट्रोल टाकले. यानंतर हातातील पेट्रोलने भरलेली कॅन घराच्या वरच्या मजल्यावर फेकून त्यातील पेट्रोल घरावर ओतले. यानंतर दुचाकी व घराला आग लावून दोघे माथेफिरू पळून गेले. घर पेटताच याठिकाणी गौरव पवार नावाचा तरुण पोहचला होता. त्याने दोन्ही माथेफिरूंचा पाठलाग केला. दोघेजण खोटेनगरच्या मार्गाने शहराबाहेर पळून गेले. त्यानंतर तो तातडीने पुन्हा घटनास्थळी आला. दरम्यान, चौधरी यांच्या दुमजली घराबाहेरील दुचाकी, किराणा दुकान, वरच्या मजल्यातील गॅलरीमध्ये ठेवलेले सोफासेट, इतर साहित्याने पेट घेतला हाेता. आग वाढल्यामुळे घरातही प्रचंड प्रमाणात धूर झाला होता. गौरवने आरडा-ओरड 

केल्यानंतर चौधरी कुटुंबीय व परिसरातील लोकही जागे झाले. सर्वांनी प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली. घरात झोपलेल्या पाच जणांना बाहेर काढले. यात एक १४ दिवसांचा बालकही होता. सुदैवाने घरातील लोकांचे प्राण वाचले आहे. 

 

कुटुंबीयांनी व्यक्त केला दोघांवर संशय : सुनंदा यांचा मुलगा पौरस चौधरी (वय २८) याने सट्टा व जुगाराच्या नांदी लागून त्याचा साडू अनिल रमेश चौधरी व भावना झुलालाल लोढा यांच्याकडून सुमारे २० लाख रुपये उसनवार घेतले होते. यातील काही पैसे दोघांना परत केले आहेत. तरीदेखील पौरसकडून पैसे उकळण्यासाठी ते वारंवार त्रास देत असतात. गेल्या महिन्यात त्यांनी पौरसला बेदम मारहाण केली होती. तेंव्हापासून तो घर सोडून गेला आहे. घर जाळण्याच्या मागे देखील अनिल व भावना यांचाच हात असल्याचा आरोप सुनंदा चौधरी यांनी पोलिसांकडे व्यक्त केला आहे. त्रास देणे, मारहाण करण्यासंदर्भात या दोघांविरुद्ध पूर्वीदेखील अदखलपात्र गुन्हे दाखल केले असल्याचे सुनंदा चौधरी यांनी सांगितले.


धुरामुळे वेळीच जाग अाल्याने पाच जणांचे प्राण वाचले 
शहरातील द्राैपदीनगरात घरासमाेर पेट्राेल टाकून जाळलेली दुचाकी. 


२५ हजारांचे झाले नुकसान, अज्ञात माथेफिरूंचे कृत्य 
सोमवारी सकाळी जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक वाघमारे यांनी पंचनामा केला. या आगीत दुचाकीसह इतर साहित्य, असे सुमारे २५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. सुनंदा चौधरी यांच्या फिर्यादीवरून दोन अज्ञात माथेफिरूंविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल झाला

बातम्या आणखी आहेत...