आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Trinamool Congress MP Mimi Chakraborty And Nusrat Jahan, Arrived In Parliament, Trollers Said 'This Is Not A Fashion Parade'

संसदेत पोहोचल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार मिमी चक्रवर्ती आणि नुसरत जहा, तर ट्रोलर्स म्हणाले - 'ही फॅशन परेड नाही'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : बंगाली अभिनेत्री मिमी चक्रवर्ती आणि नुसरत जहां टीएमसीच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक जिंकून खासदार बनल्या आहेत. संसदेतील पहिल्या दिवशीचे काही फोटोज मिमी आणि नुसरतने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्यानंतर त्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर आल्या आहेत. झाले असे की, मिमी आणि नुसरतने फॅशनेबल अटायर आणि सनग्लासेस लावून संसदेतील फोटोज शेअर केले आहेत. त्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी त्यांची खिल्ली उडवली तर अनेकांनी त्यांना सल्ले दिले. 

 

मिमी चक्रवर्तीने टीएमसीच्या तिकिटावर जाधवपुरमधून निवडणूक जिंकली आहे. तर नुसरत जहांने बशीरहाटमधून विजय मिळवला. 

 

मिमी चक्रवर्तीने सोमवारी आपले फोटो ट्वीट केले होते आणि लिहिले होते, 'आम्ही पुन्हा एकत्र आहोत, संसदेतील पहिला दिवस'
 

"And its us again
1st day at Parliament @nusratchirps pic.twitter.com/ohBalZTJCV"

 

 

स्टायलिश लुकमध्ये संसदेत पोहोचलेल्या मिमी आणि नुसरतला ट्रोलर्सने घेरले. मिमीने डेनिमसोबत व्हाईट शर्ट आणि व्हाईट स्नीकर्स घातले होते. तर नुसरत पॅन्टसूट घालून आली होती. दोघींनी सनग्लासेस लावलेले होते आणि आपले आयडी कार्ड दाखवताना त्या दिसल्या. 

 

"आपली उपस्थिति संसदेत अशीच कायम ठेवा, तुमच्यामुळे सदनातील उपस्थिति 100% होऊन जाईल." 
 

"Keep the attendance cent percent so that the house attendance remains 100%"

 

 

"I think people are voted both of you for solving their problems, not for photoshoot in front of parliament.
You just think what happened if the heros of our freedom fighters are seen this....!"

 

 

"As they do meaning less bengali movie ... same they will show their brainless beauty there .... utter rubbish"

 

 

"Hope future won't be about poses n makeups rather serious development to area concerned!!"

 

 

"तुम्ही संसदेत स्वतः आलेल्या नाहीत, तुम्हाला आणले गेले आहे. #ModiHaiToMumkinHai @PoojaRBademi @AngelAhana6 @vivekoberoi"

 

 

"आमचे पंतप्रधान संसद भवनाला नमन करून प्रवेश करतात. 
आणि काही खासदार सुट्ट्या एन्जॉय करण्याच्या मूडमध्ये जातात. @MamataOfficial यांची अशी कृपा." 

 

 

"Good Luck beautiful ladies. Do well for the country and STAY CLEAR OF SHASHI THAROOR please. "

 

 

"Are both going in fashion pared???"

बातम्या आणखी आहेत...