आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मणिपूरमध्‍ये तृणमूल कॉंग्रेस स्‍वबळावर लढणार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍लीः आगामी विधानसभा निवडणुकीमध्‍ये तृणमूल कॉंग्रेस सामर्थ्‍य सिद्ध करण्‍यासाठी सज्‍ज आहे. पश्चिम बंगालपाठोपाठ आता मणिपूरमध्‍ये सत्‍ता स्‍थापनेचा इरादा तृणमूलच्‍या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी जाहीर केला आहे. मणिपूरमध्‍ये तृणमूल कॉंग्रेस 42 जागांवर निवडणूक लढविणार आहे. मणिपूरशिवाय उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्‍येही तृणमूलने निवडणूक लढविण्‍याचा निर्णय घेतला आहे. मणिपूरमध्‍ये तृणमूल कॉंग्रेस स्‍वबळावर निवडणूक लढविणार आहे. ममता बॅनर्जी यांच्‍या या निर्णयामुळे कॉंग्रेसचे नुकसान होण्‍याची शक्‍यता व्‍यक्त करण्‍यात येत आहे. याचा उत्तर प्रदेश आणि मणिपूरमध्‍ये सर्वाधिक फटका बसू शकतो, असे बोलले जात आहे.