आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त 1 चमचा हे चूर्ण घेतल्याने दूर राहतील तुमच्यापासून गंभीर आजार, नेहमी राहाल तंदुरुस्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

त्रिफळा तीन हर्ब्स आवळा, हरड आणि बेहडा याचे संयोजन असते. हे तिन्हीही पदार्थ शरीरासाठी फायदेशीर आहेत. परंतु एकत्र मिसळल्याने याचे फायदे अजूनच वाढतात. आयुर्वेदतज्ञ डॉ. उमेश शर्मा सांगत आहेत त्रिफळाचे फायदे... 


- रोज सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा त्रिफळा पावडर आणि एक चमचा मध मिसळून प्यायल्याने लठ्ठपणा दूर होतो. 


- त्रिफळा अँटिऑक्सिडंट असते. हे नियमित घेतल्याने केस लवकर पांढरे होत नाहीत. त्वचेवर सुरकुत्या लवकर पडत नाहीत. 


- रात्री मातीच्या भांड्यात एक चमचा त्रिफळा पावडर पाण्यात भिजवून ठेवा. हे सकाळी पाण्याने गाळून प्यायल्याने डोळ्यांची शक्ती वाढते आणि डोळे धुतल्याने डोळ्यांची जळजळ दूर होते. 

- सकाळ-संध्याकाळ दोन चमचे त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यासोबत घेतल्याने त्वचारोगापासून आराम मिळतो. 


- त्रिफळाच्या पाण्याने गुळण्या केल्याने तोंडाची दुर्गंधी आणि इतर आजार दूर होतात. 


- त्रिफळा पावडरने दात स्वच्छ केल्याने दातांच्या वेदनांपासून आराम मिळतो. 


- त्रिफळा नियमित घेतल्याने श्वासांच्या समस्यांपासून आराम मिळतो. हे फुप्फुसांचा संसर्ग दूर करते. 


- त्रिफळा अँटिसेप्टिकप्रमाणे काम करते. याच्या पाण्याने जळजळ लवकर बरी होते. 


- त्रिफळा पेन्क्रियाज अॅक्टिव्ह ठेवते. ज्यामुळे रक्तामध्ये इन्सुलिनचे उत्पादन वाढते आणि साखरेचे प्रमाण संतुलित राहते. 


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर खास फायदे...

बातम्या आणखी आहेत...