आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Triple Murder In Navi Mumbai; Police Suspect That Three Workers, Who Were Sleeping In The Warehouse, Were Killed In A Blood Money Dispute

नवी मुंबईत तिहेरी हत्याकांड; भंगाराच्या गोदामात झोपलेल्या तीन कामगारांचा निर्घृण खून, पैशांच्या वादातून हत्या झाल्याचा पोलिसांना संशय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- येथील तुर्भे एमआयडीसीत असलेल्या भंगाराच्या गोदामात झोपेत असलेल्या तीन कामगारांची कामगारांची हत्या झाल्याचे समोर आले आहे. बोनसरी गावात ही घटना घडली, यामुळे परिसरात खळबळ उडाली. आर्थिक व्यवहारातून हे तिहेरी हत्याकांड झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तुर्भे एमआयडीसीतील बोनसरी गावाजवळ अनधिकृतपणे चालत असलेल्या भंगाराच्या गोदामात हा प्रकार घडला. मृतांमध्ये इरशाद (20 ), नौशाद (14) आणि राजेश (28) हे आहेत. या ट्रिपल मर्डरमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.


हल्लेखोरांनी तिन्ही कामगारांच्या डोक्यात जड वस्तूने हल्ला केला, त्यानंतर त्यांच्यावर कोयत्याने सपासप वार करुन ही हत्या केली. या हत्येनंतर त्यांचे मृतदेह त्याच ठिकाणी लपवण्यात आले होते. शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, तपास सुरू केला. घटनास्थळी पोलिसांचे श्वान पथक आणि फिंगर प्रिंट शोधणारी टीम दाखल झाली. मारेकऱ्यांना शोधण्यासाठी पोलिसांची विविध पथके शहरातील विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत.