Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | triple murder in shirdi, cut throats with knife by neighbor

तिहेरी हत्याकांडाने शिर्डी हदरली, किरकोळ वादातून एकाच कुटुंबातील तिघांचे कोयत्याने कापले गळे

दिव्य मराठी वेब, | Update - Jul 13, 2019, 03:29 PM IST

हत्या केल्यानंतर आरोपी आपल्या घरात जाऊन बसला, पोलिसांनी घेतले ताब्यात

  • triple murder in shirdi, cut throats with knife by neighbor

    शिर्डी- तिहेरी हत्याकांडाने शिर्डी हदरुन गेली आहे. येथील एकाच कुटुंबातील तिघांची हत्या झाल्याचे सकाळी साडेसहाच्या सुमारास उघडकीस आले. निमगाव शिवारात मंगेश कातोरे यांच्या वस्तीवर राहणाऱ्या ठाकूर कुटुंबियांची हत्या झाली आहे. ठाकूर यांच्या शेजारी राहणाऱ्या अर्जुन पन्हाळेने किरकोळ वादातून या हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेत 65 वर्षीय दादा ठाकूर, 60 वर्षीय दगडूबाई ठाकूर आणि 16 वर्षाची खुशी ठाकूर यांचा मृत्यू झाला आहे.

    आरोपी अर्जुन पन्हाळेने आज(13 जुलै) सकाळी 11.30 च्या सुमारास ठाकूर कुटुंबीयातील तिघांचे कोयत्याने गळे कापले. अर्जुन पन्हाळेच्या हल्ल्यात राजेंद्र ठाकूर(35वर्षे) आणि तावू ठाकूर (18 वर्षे) हे दोघे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारांसाठी साईबाबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या हल्यात एक सहा वर्षांची मुलगी वाचली आहे. हत्येनंतर आरोपी शेजारीच असलेल्या त्याच्या खोलीत जाऊन बसला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून या घटनेमुळे शिर्डी हादरून गेली आहे.

Trending