आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ट्रिपल सीट’ फेम अभिनेत्री पल्लवी पाटीलने सामाजिक बांधिलकी जपत साजरा केला वाढदिवस

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘ट्रिपल सीट’ फेम अभिनेत्री पल्लवी पाटील अभिनयक्षेत्रासोबतच समाजसेवेतही सक्रिय असते. ती नेहमीच वेगेगळ्या संस्थांसोबत राहून समाजकार्यात आपला खारीचा वाटा उचलत असते. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या समाजसेवी संस्थांसोबत काम करणा-या पल्लवीने नुकताच आपला वाढदिवस मुंबईतल्या अनाथ मुलांसह साजरा केला. पल्लवी पाटील सांगते, “मी जळगाव आणि पुण्याजवळच्या सामाजिक संस्थांमध्ये जाऊन कार्य करत असल्याने माझ्या वाढदिवशी मी ब-याचदा तिथे किंवा मग आई-वडिलांसोबत गावी असते. पण यंदा पहिल्यांदाच मी कामानिमित्ताने मुंबईत असल्याने माझा वाढदिवस मी मुंबईतल्या एका सामाजिक संस्थेतल्या मुलांसोबत साजरा करायचा ठरवला.” पल्लवी पाटील पूढे सांगते, “वात्सल्य सामाजिक संस्थेच्या लहान मुलांना आणि शिक्षकांना भेटून मला वर्षभरासाठी सकारात्मक उर्जा मिळाली आहे. ह्या निरागस मुलांनी माझ्यासाठी गाणी गाऊन वाढदिवसाचं झालेलं उत्स्फर्त सेलिब्रेशन आठवणीत राहणारं आहे.”