आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन तलाक विधेयक राज्यसभेत अडकले; हुसेन दलवाईंची माफी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- तीन तलाकच्या प्रथेला गुन्हा ठरवणारे विधेयक शुक्रवारी राज्यसभेत पुन्हा अडकले. पावसाळी अधिवेशनात शेवटच्या दिवशी हे विधेयक राज्यसभेत मांडले जाऊ शकले नाही. सरकार व विरोधी पक्षांत एकमत न झाल्याने विधेयक मांडले जाणार नाही, असे राज्यसभेचे सभापती नायडू यांनी जाहीर केले.


हिवाळी अधिवेशनापर्यंत विधेयक मांडले जाणार नसल्याने अध्यादेश काढला जाऊ शकतो. शुक्रवारी हे विधेयक मंजूर करून घेण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न होता. विरोधी पक्षांनी या विधेयकातील तरतुदींमध्ये काही दुरुस्त्या सुचवल्या होत्या. त्यानुसार सरकारने तीन दुरुस्त्याही केल्या. मात्र, तरीही एकमत होऊ शकले नाही.


हुसेन दलवाईंची माफी
काँग्रेस नेते हुसेन दलवाईंनी वादग्रस्त विधान करून रोष ओढवून घेतला. मुस्लिम नव्हे, सर्वच धर्मांत महिलांना दुय्यम वागण्ूक आहे. प्रभू रामचंद्रांनीही केवळ संशयावरून सीतेला सोडले होते. म्हणून आपल्याला सर्व काही बदलून टाकले पाहिजे, असे दलवाई म्हणाले. वादानंतर त्यांनी माफी मागितली.

बातम्या आणखी आहेत...