आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Triple Talaq Bill Vidheyak Passed In Lok Sabha, Muslim Women Protection Of Rights On Marriage Bill News

तीन तलाक विधेयक मंजूर; पाच महीन्यात दुसऱ्यांदा पास झाले बील, मागच्या वेळेस राज्यसभेत अडकले होते

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- लोकसभेत आज(गुरुवार) तीन तलाक विधेयक चर्चेनंतर पास झाले. विधेयकाच्या बाजूने 303 आणि विरोधात 82 मतं पडले. लोकसभेत बील पास होण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी फेब्रुवारीत लोकसभेत विधेयकाला मंजूरी मिळाली होती, पण राज्यसभेत हे विधेयक अडकून पडले होते. त्यानंतर मोदी सरकारने परत सत्तेत आल्यावर या विधेयकाला सादर केले आणि व्होटिंग दरम्यान काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि जेडीयूने सभागृहातून काढता पाय घेतला. 


महिलांच्या प्रतिष्ठेशी संबंधित विधेयक: रविशंकर
चर्चेदरम्यान कायदे मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले, "हे विधेयक कोण्या एका धर्माचे नाहीये, हे महिलांच्या प्रतिष्टेची संबंधित आहे. सुप्रीम कोर्टाने गरीब मुस्लिम महिलांना न्याय मिळायला हवा असे याआधीच सांगितले आहे. सीजेआयने तीन तलाकला असंवैधानिक असल्याचे सांगित नवीन कायदा काढण्यास सांगितले होते. कोर्टाच्या निर्णयानंतर देशात तीन तलाकचे 345 प्रकरणे समोर आले." दुसरीकडे यूपीएने आपल्या सर्व पक्षांसोबत या विधेयकाचा विरोध केला. 


ओवैसी म्हणाले- कायदा महिलांवर आत्याचाराप्रमाणे आहे
असदुद्दीन ओवैसींनी विधेयकाचा विरोध केला. ते म्हणाले, ''तीन तलाक कायदा महिलांच्या विरोधात आहे. घटस्फोटीत महिलांचे पती तुरुंगात राहून त्यांना भत्ता देऊ शकणार आहेत का. सरकार या प्रकारे महिलांना रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न करत आहे. इस्लाममध्ये लग्न एक कॉन्ट्रॅक्टप्रमाणे आहे. लग्न म्हणजे जन्मो-जन्मीचे बंधन नाहीये. माझे असे म्हणने आहे की, कायदा न काढता हूंड्यात घेतलेल्या रकमेच्या 500% रक्कम परत देण्याचा कायदा काढावा. आमची इस्लामिक देशांसी तुलना करू नका, नाहीतर याने कट्टरपंथ्यांना चालना मिळेल.''


जदयूने केला विरोध
एनडीएच्या सोबत असलेल्या जदयूने आधीच लोकसभेत विधेयकाला समर्थन देत नसल्याचे सांगितले आहे. जदयू खासदार राजीव रंजन सिंह म्हणाले की, या विधेयकामुळे एका विशीष्ट समाजात अविश्वासाची भावना निर्माण होईल, त्यामुळे आमचा पक्ष याचे समर्थन करणार नाही.

बातम्या आणखी आहेत...