आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिहेरी तलाक; पत्नीची बाजू ऐकून पतीला मिळू शकेल जामीन; दुरुस्ती विधेयक अाज राज्यसभेत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- मुस्लिम समाजातील तिहेरी तलाकच्या प्रथेला बेकायदेशीर ठरवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या विधेयकात गुरुवारी केंद्राने तीन दुरुस्त्या केल्या आहेत. कायदा बनल्यानंतर त्याचा दुरुपयोग होण्याची शंका असल्याने जामिनाची तरतूद यात जोडण्यात आली. नवीन तरतुदीनुसार तिहेरी तलाकमध्ये पीडित महिला किंवा तिचे नातेवाईकच एफआयआर दाखल करू शकतील. 


पती, पत्नींची इच्छा असल्यास न्यायाधीशांच्या संमतीने खटला परत घेता येईल. मुस्लिम महिला (विवाह अधिकार संरक्षण) विधेयकातील तिन्ही दुरुस्त्यांना केंद्रीय कॅबिनेटने मंजुरी दिली. विधेयक लोकसभेत पारित झाले असून राज्यसभेत प्रलंबित आहे. शुक्रवारी पावसाळी अधिवेशनाचा शेवटच्या दिवशी दुरुस्ती विधेयक राज्यसभेत सादर केले जाईल. विधेयक राज्यसभेत पारित झाल्यानंतर दुरुस्तीवरील मंजुरीसाठी ते परत लोकसभेत सादर केले जाईल. पत्रकार परिषदेत कायदामंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले, विधेयकाला अनुसरून काही शंका उपस्थित केल्या जात होत्या. त्या शंकांचे आम्ही निरसन केले आहे. 

बातम्या आणखी आहेत...