आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डी. वाय. पाटलांची काँग्रेसला सोडचिठ्‍ठी..राष्ट्रवादीत केला प्रवेश; राजकीय वर्तुळात खळबळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- त्रिपुराचे माजी राज्यपाल आणि काँग्रेस येष्ठ नेते डॉ. डी. वाय. पाटील यांनी रविवारी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांच्या उपस्थितीत डी. वाय. पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. पाटील यांनी राष्ट्रवादीचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले आहे. मुलाचा मुख्य विरोधक ज्या पक्षात आहेत, त्याच पक्षात डी. वाय. पाटील यांनी प्रवेश केल्याने कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

 

डी.वाय. पाटील यांचे सुपुत्र सतेज पाटील यांचे राजकीय विरोधक मानले जाणारे धनंजय महाडिक हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत. सतेज पाटील हे काँग्रेसचे विधानपरिषदेचे विद्यमान आमदार आहेत.

 

दरम्यान, 2009 ते 2013 या काळात डी. वाय. पाटील हे त्रिपुरा, तर 2013 ते 2014 या काळात बिहारचे राज्यपालही होते. याशिवाय, त्यांच्याकडे पश्चिम बंगालच्या राज्यपालपदाचाही कार्यभार काही काळासाठी होता.

बातम्या आणखी आहेत...