आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्तिक पौर्णिमेला का म्हणतात त्रिपुरारी पौर्णिमा, महादेवाशी आहे खास संबंध

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धर्म ग्रंथानुसार कार्तिक पौर्णिमा (23 नोव्हेंबर, शुक्रवार)ला महादेवांनी तारकाक्ष, कमलाक्ष आणि विद्युन्माली यांच्या त्रिपुरा(नगर)चा नाश केला. त्रीपुरांचा नाश केल्यामुळेच महादेवाचे एक नाव त्रिपुरारी असे पडले. येथे जाणून घ्या,महादेवाने या तिन्ही त्रीपुरांचा नाश कसा केला...


ब्रह्मदेवाने दिले वरदान
असुर बालीची कृपा प्राप्त त्रिपुरासुर क्रूर राक्षस होते. तिन्ही मुले तपश्चर्या करण्यासाठी जंगलात गेले आणि हजारो वर्षांपर्यंत अत्यंत कठोर तप करून त्यांनी ब्रह्मदेवाला प्रसन्न केले. तिघांनीही ब्रह्मदेवाकडून अमरत्वाचे वरदान मागितले. ब्रह्मदेवाने त्यांना वरदान देण्यास नकार दिला आणि त्यांना एखादे असे वरदान मागण्यास सांगितले ज्यामुळे तुमचा मृत्यू सहजासहजी होणार नाही.


तिघांनीही खूप विचार केल्यानंतर वरदान मागितले - हे प्रभू ! तुम्ही आमच्यासाठी तीन पुरींचे (नगर) निर्माण करा. हे तिन्ही नगर जेव्हा अभिजित नक्षत्रामध्ये एका रेषेत येतील आणि एखादा क्रोधाजित अत्यंत शांत अवस्थेमध्ये असंभव रथ आणि असंभव बाणांच्या मदतीने आम्हाला मारण्याचा प्रयत्न करेल तेव्हाच आमचा मृत्यू होईल. ब्रह्मदेव म्हणाले - तथास्तु.


पुढे वाचा, कोणकोणते तीन नगर निर्माण करण्यात आले...

बातम्या आणखी आहेत...