आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Trollar Asked Arjun Kapoor, 'you Hated Sridevi Because She Took Your Mom's Place Then How Can You Love Mallika ?'

सोशल मीडिया : ट्रोलरने विचारले, 'श्रीदेवींचा द्वेष आणि मलायकावर प्रेम, असे दुतोंडी वागणे का ?', भडकलेल्या अर्जुनने दिले सडेतोड उत्तर 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : वरुण धवनचा एका फॅनने अर्जुन कपूरवर दुतोंडी वागण्याचा आरोप केला आहे. कुसुमने अर्जुनच्या मलायका अरोराला डेट करण्याबद्दल प्रश्न विचारला, श्रीदेवींचा द्वेष आणि मलायकावर प्रेम ? यांनतर अर्जुनने कुसुम नावाच्या या फॅनला सडेतोड उत्तर दिले. 

 

कुसुमने श्रीदेवी यांची मलायकाशी केली तुलना... 
झाले असे की, कुसुमने आपल्या ट्विटरवर ट्वीट करून विचारले, 'तू तुझ्या पित्याच्या दुसऱ्या पत्नीचा द्वेष करायचा. कारण त्यांनी कुणासाठी तरी तुझ्या आईला सोडले होते आणि आता तू तुझ्यापेक्षा 11 वर्षांनी लहान आणि एका टीनएज मुलाच्या आईला डेट करत आहे. असे दुतोंडी वागणे का ? 

 

अर्जुनने ऐकवले खरे खोटे... 
यावर अर्जुन कपूरने उत्तर दिले. तो म्हणला, 'मी कुणाचा द्वेष करत नाही. सोशल मीडियावर काहीही लिहिणे सोपे असते, आम्ही दोघांनीही सामंजस्याने एक अंतर ठेवले होते. जर मी असा असतो तर कठीण वेळ आल्यावर माझे वडिल, जान्हवी आणि खुशीची साथ मी दिली नसती. तू वरुण धवनची फॅन आहेस त्यामुळे त्याचा डीपी लावून नकारात्मकता पसरवली नाही पाहिजे.' 

 

फॅनने मागितली माफी... 
अर्जुनच्या या प्रश्नानंतर कुसुमने अर्जुनची माफी मागितली. तिने आपले पहिले ट्वीट डिलीट केले आणि दुसऱ्या एका ट्वीट मध्ये लिहिले, "माझा हेतू कुणालाही दुखावण्याचा नव्हता. मी केवळ माझे मत मांडत होते. जर माझ्या बोलण्याने कुणाला त्रास झाला असेल तर मी अर्जुन कपूर आणि त्याच्या फॅन्सची माफी मागते. मी अर्जुन सर, मलायका मॅमच्या विरुद्ध काहीच नव्हते.  

 

अर्जुनने मग दिले असे उत्तर... 
कुसुमने माफी मागितल्यानांतर अर्जुन आणि वरुण दोघांनीही कुसुमच्या ट्वीटचे उत्तर देऊन तिला माफ केले. अर्जुनने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले, 'काही हरकत नाही कुसुम, प्रेम पसरावा स्ट्रीट डांसर तुला पाहात आहे... 

 

वरुणनेदेखील व्यक्त केला आनंद... 
तसेच वरुणनेही ट्वीट करून लिहिले, 'मला आनंद आहे की, कुसुम तू माफी मागितली. सर्वानाच आपले आयुष्य आपल्या पद्धतीने जगू द्यावे. अर्जुनचेमन खूप मोठे आहे. मी नेहमी माझ्या फॅन्सलाच म्हणतो की, कोणत्याही स्टारबद्दल अशा प्रकारची कमेंट करू नका.