आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परभणीत दोन ट्रकची समोरा समोर भीषण धडक, चालक जागीच ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - जिंतूर शहरातून जाणाऱ्या औंढा रस्त्यावर सोमवारी सकाळी 10.30 वाजता ओद्योगिक प्रशिक्षण संस्थेसमोर दोन ट्रक्‍सची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात ट्रक चालक आदिनारायण आदिमान शेट्टी हे जागीच ठार झाले आहेत. ते आंध्रप्रदेशातील रहिवासी होते.

  याबाबत अधिक माहिती अशी की, ट्रक क्रमांक (AP 7 TU 6336) हा जालनाकडून नांदेड कडे जात होता. तर दुसरा ट्रक (क्रमांक MH 26 1992) हा नांदेडकडून जालनाकडे जात होता. सकाळी 10.30 वाजता औंढा रस्‍त्‍यावर या दोन ट्रकमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्‍ये आदिनारायण हे जागीच ठार झाले तर दुसऱ्या ट्रक मधील चालक अपघात होताच ट्रक सोडून पळून गेला. याबाबत जिंतूर पोलीस स्थानकात सायंकाळ उशिरा पर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी महामार्ग पोलिस पथकाचे कर्मचारी आणि पुंगळा येथील ग्रामस्थांनी धाव घेतली व अपघातग्रस्तांना मदत केली.

 

 

 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...