आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकीला धडकल्याने घाबरलेल्या चालकाने मारली उडी, चालू ट्रकने १९ गाड्या ठोकरल्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- गुरुवार वेळ रात्री साडेनऊची, सगळेजण फुटपाथवर बोलत उभारलेले, अचानक विनाचालक एक ट्रक येतो आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या पार्किंगमध्ये घुसतो. कोणाला काही समजलेच नाही. सर्वत्र पळापळ झाली आणि एकच गर्दी झाली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. एकीकडे जडवाहतूक सुरू तर दुसरीकडे या घटनेमुळे वाहतूक जाम झाली होती. 


विजापूर रोड येथील गोविंद मेडिकलसमोर रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ट्रक (आर जे ०५, जी ए ५४५९) ने दुचाकीस्वार सुनील कुलकर्णी (वय ६७, रा. राजस्वनगर) या वृद्धाला धडक दिली. आता नागरिक आपल्याला बदडतील या भीतीने चालक नेमसिंग सक्सेना (वय ५५, रा. दमेना, आग्रा) ने चालत्या ट्रकमधून उडी मारली. विनाचालकाचा ट्रक जुना विजापूर नाका येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या पार्किंगमध्ये घुसला अन् एक रिक्षा आणि तब्बल १९ दुचाकींचे नुकसान झाले. सर्वजण ट्रकच्या पाठीमागे ओरडत पळत सुटले. 


तेवढ्यात सचिन काशिद नावाच्या तरुणाने मोठ्या हिमतीने त्या चालत्या ट्रकवर चढून ट्रक थांबवला अन् मोठा अनर्थ टळला. सुनील कुलकर्णी व्यतिरिक्त कोणीही जखमी झाले नाही. ट्रकचालकास ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. याबाबत विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


नुकसान झालेल्या दुचाकी
एमएच १३ डीबी १८९०, एमएच ०९ व्ही ६४४९, एमएच १३ सी जी ९००५, एमएच १३ बी जे ६८८२, एमएच १३ बी एक्स ५३१३, एमएच १३ सी एच ८५०३, एमएच १३ ए बी ७१९३, एमएच १३ झेड ३३२९, एमएच २५ झेड ०१२०, एमएच १३ बी जे ४११३, एमएच १३ सी एन ८८८५, एमएच १३ बी के ४७२७, एमएच १३ डी बी २६४३, एमएच १३ बी एस ९४७१, एमएच १३ ए बी ९१९०, एमएफएन ८८०, एमएच ४२ एच १८५९, एमएच १२ सी एस ९२८७, एमएच १३ सी टी ०८८४- रिक्षा 

बातम्या आणखी आहेत...