Home | Maharashtra | Vidarva | Nagpur | truck and bus accident in Nandgaon Peth

ट्रकची एसटीला धडक; सहा प्रवासी जखमी

प्रतिनिधी | Update - Jan 13, 2019, 11:19 AM IST

नांदगाव पेठ टोल नाक्यावर घडला अपघात

  • truck and bus accident in Nandgaon Peth


    नांदगाव पेठ - अमरावतीवरून मोर्शीकडे जाणाऱ्या भरधाव ट्रॅकचे ब्रेक अचानक निकामी झाल्याने अनियंत्रित ट्रक येथील टोल नाक्यावर उभ्या असलेल्या एसटीवर धडकला. ही घटना शनिवारी (दि. १२) सकाळी ११ वाजताच्या सुमारास टोल नाक्यावर घडली.


    नांदगाव पेठ येथे एका शेतात संत्रा आणण्यासाठी जात असलेल्या ट्रकचे (टीएन ३०/ एडब्ल्यू ४४५४) येथील टोल नाक्याजवळ अचानक ब्रेक निकामी झाल्याने ट्रक चालकाने वाहन नसलेल्या ठिकाणावरून ट्रक काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान त्याच वेळी अमरावतीवरून मोर्शीकडे जाणारी एसटी (एमएच ४०/ एन ९१२०) टोल नाक्यावर पावती फाडण्याकरिता थांबली. वाहन नसलेल्या मार्गाने ट्रक काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या भरधाव ट्रकने एसटीला मागून धडक दिली. यामध्ये सहा प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. जखमींना उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

Trending