accident / Accident: पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रक-कारची समोरासमोर धडक; 9 महाविद्यालयीन तरुणांचा जागीच मृत्यू

नियंत्रण सुटल्याने डिव्हायडर पार करून समोरून येणाऱ्या ट्रकवर धडकली कार

दिव्य मराठी वेब

Jul 20,2019 10:54:58 AM IST

पुणे - पुणे-सोलापूर महामार्गावर Ertiga कार व ट्रक यांची सामोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात नऊ महाविद्यालयीन तरुण जागीच ठार झाले आहेत. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री एक वाजेच्या सुमारास कदम वकवस्तीजवळ हा अपघात झाला. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार डिव्हायडर पार करून समोरुन येणाऱ्या ट्रकला धडकली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. तर ट्रकचा समोरील भाग पूर्णपणे चेपला. घटनास्थळावरून समोर आलेल्या छायाचित्रांवरून अपघाताची दाहकता दिसून येते.

अक्षय भारत वाईकर, विशाल सुभाष यादव, निखिल चंद्रकांत वाबळे, सोनू ऊर्फ नूर महमद आशपाक अत्तार, परवेज आशपाक अत्तार, शुभम रामदास भिसे, अक्षय चंद्रकांत गिघे, दत्ता गणेश यादव, व जुबेर अजित मुलानी अशी मृतांची नावे आहेत. हे सर्व पुण्यातील यवत गावातील रहिवासी होते. पावसाळ्यात सर्वांनी मिळून रायगड फिरून येण्याचा प्लॅन केला होता. त्यानुसार, रायगडला गेले आणि मजा-मस्ती करताना अनेक सेल्फी देखील काढल्या. त्याच ठिकाणावरून घरी येत असताना पुणे-सोलापूर महामार्गावर त्यांच्या वाहनचालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. भरधाव कार डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेला गेली आणि समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकवर आदळली.

X
COMMENT