आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उभ्या ट्रकला जीपची धडक, जीपचा झाला चुराडा; तीन जण ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा  - पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटाजवळ उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून बाेलेरो जीपने धडक दिल्याने तीन जागीच ठार, तर दोन जण जखमी झाले. हा अपघात रविवारी घडला. विलास शंकर सामंत (६२), बाळकृष्ण शंकर सामंत (६७)आणि विनय गंगाधर सामंत (५४, सर्व रा. बोरिवली) अशी मृतांची नावे आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी सकाळी काेकणातून बोरिवलीकडे जाण्यासाठी सामंत कुटुंब निघाले. या वेळी खंबाटकीजवळ एका हॉटेलसमोर एक ट्रक आधीपासूनच उभा होता. हॉटेलजवळ आल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने जीप थेट उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन आदळली. ही धडक एवढी जोरदार होती की,जीपचा अक्षरश: चुराडा झाला. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला.

 

जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोलिस दाखल झाल्यानंतर त्यांनी नागरिकांच्या मदतीने मृतदेह जीपबाहेर काढले. तसेच जखमींना शिरवळच्या रुग्णालयात दाखल केले असून यातील काही जणांची प्रकृती गंभीर आहे. यातील काही जणांवर साताऱ्यातील रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, गेल्या काही महिन्यांत या महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

बातम्या आणखी आहेत...