Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | Truck Burn at Ajanta Ghat

सिमेंटची राख वाहून नेणार्‍या टँकरने अजिंठा घाटात घेतला पेट, सुदैवाने जीवितहानी टळली

प्रतिन‍िधी | Update - Feb 06, 2019, 01:57 PM IST

अजिंठा घाट चढते वेळी शेवटच्या टोकावर टँकरच्या समोर स्टेअरिंगखाली शॉर्टसर्किट झाल्याने पेट घेतला.

  • Truck Burn at Ajanta Ghat

    अजिंठा- भुसावळहून पुण्याकडे 30 टन सिमेंटची राख घेऊन जाणाऱ्या चालत्या टँकरने शॉर्टसर्किटमुळे घाटात पेट घेतला. वेळीच चालकाच्या लक्षात आल्याने टँकर महामार्गावर थांबवून उतरला. मात्र टँकरचा स्टेअरिंगसह पूर्ण भाग जळून खाक झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. यामुळे महामार्गावर अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती.

    भुसावळहून टँकर क्र. एमएच 12 एलटी 9196 चालक ईश्वर गिते (रा. परळी वैजनाथ) हा घेऊन जात असताना अजिंठा घाट चढते वेळी शेवटच्या टोकावर टँकरच्या समोर स्टेअरिंगखाली शॉर्टसर्किट झाल्याने पेट घेतला. चालक ईश्वरच्या लगेच लक्षात आल्याने खाली उतरला. याची माहिती मिळताच जवळ असलेल्या आकाश ढाब्यावरील राजू गुरुभैय्ये, शकील भाई, फारुख भाई, अनिल सोनवणे, परमेश्वर तेली, देवानंद दांडगे, योगेश चोंडिये, गणेश मोरे यांनी पाण्याचा टँकर बोलावून आग विझविली.

    पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. पेटत्या टँकरचे फोटो...

  • Truck Burn at Ajanta Ghat
  • Truck Burn at Ajanta Ghat
  • Truck Burn at Ajanta Ghat

Trending