आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआगरा(उत्तर प्रदेश)- शुक्रवारी सकाळी 5 वाजता यमुना एक्सप्रेस-वेवर एक डबल डेकर बस आणि ट्रकची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात 8 लोकांचा मृत्यू झाला तर 30 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. अपघात झाल्यानंतर लोकांच्या ओरडण्याचा अवाज ऐकून स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांना घटनेची माहिती दिला. पोलिसांनी लोकांच्या मदतीने बसमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. जखमी लोकांनी जवळच्या रूग्णालयात भर्ती करण्यात आले असून, त्यापैकी 10 जणांची प्रकृती गंभीर अहे.
अपघातानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्वीट करून दुख:व्यक्त केले आहे तसेच जिल्हा प्रशासन आणि पोलिसांना यात मदत करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी ट्वीटमध्ये लिहीले, 'आज ग्रेटर नोएडामध्ये झालेल्या बस अपघातात 8 लोकांचा मृत्यू झाल्याने मला खुप दुख: होत आहे, देव त्यांच्या आत्म्यास शांती देओ. जे लोक यात जखमी झाले आहे, ते लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो.'
प्रत्यक्षदर्शी म्हणाले- बेगात होती बस
औरैया डेपोच्या या अपघातात बस आग्र्यावरून प्रवाशांने घेऊन नोएडाला येत होती. या दरम्यान रबूपूराजवळ बेगाने येणाऱ्या बस ड्रायव्हरने समोरच्या ट्रकला पाहिले नाही आणि ट्रकला मागून टक्कर मारली. अपघातात बसच्या समोरच्या बाजुचे मोठे नुकसान झाले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.