Accident / जळगावः चोपडा येथील काजीपुरा फाट्यावर कार-ट्रकचा भीषण अपघात, तीन जणांचा जागीच मृत्यू

मृतांमध्ये मांजरोद येथील ग्राम पंचायत सदस्याचाही समावेश

दिव्य मराठी

May 12,2019 10:18:00 AM IST

जळगाव - चोपडा तालुक्यातील काजीपुरा फाट्यावर ट्रक आणि कारचा भीषण अपघात घडला आहे. अपघात इतका भयंकर होता की कारचा चेंदामेंदा झाला. तसेच तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये सर्वच तिघे शिरपूर तालुक्यातील रहिवासी होते. प्रहार शेतकरी संघटनेचे शिरपूर तालुका अध्यक्ष व मांजरोद ग्रामपंचायतचे सदस्य नामदेव कोळी, भाटपुरा येथील किशोर गजानन बिऱ्हाडे, बभळाज येथील अनिल दशरथ जाधव अशी मृतांची नावे आहेत. यासोबत दुर्घटनेत आणखी एक जण सागर नरेश पाटील यात गंभीर जखमी आहे. त्यांच्यावर सुरुवातीला ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. यानंतर परिस्थिती बिघडल्याचे पाहता त्यांना जळगावला हलवण्यात आले आहे.

X