आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे - सोलापूर महामार्गावरील रेल्वे पुलावरून वीस फूट खाली कोसळला मालवाहू ट्रक, सुदैवाने मोठा अनर्थ टळला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माढा - पुणे सोलापुर महामार्गावर एक ट्रक रेल्वेपुलावरील कठडे तोडुन खाली असलेल्या रेल्वे लाईनवर कोसळला. या दरम्यान कोणतीही रेल्वे या लाईनवरुन जात नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. आज सकाळी 9 वाजता ही घटना घडली.
 
मोहोळ मार्गे सोलापुर च्या दिशेने चाललेला मालट्रक वडवळ गावच्या पुलावरुन वीस फुट खाली कोसळला. या ट्रकमध्ये रस्त्याच्या कामासाठी वापरले जाणारे डांबराचे ड्र्म रेल्वे लाईन वर पडले आहेत. यामुळे या रेल्वे लाईनवरुन होणारी रेल्वे वाहतुक थांबवण्यात आली आहे. ट्रक ड्रायव्हर जखमी झाला असुन त्यास उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

सोलापुर-पुणे महामार्गावरुन जाणारे वाहनधारकांनी ही घटना पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. एका 
रेल्वेलाईन वरील डांबराचे ड्र्म काढल्यावरच या मार्गावरील रेल्वे वाहतुक सुरु राहणार आहे. मालवाहू ट्रक खाली कोसळण्याच्या दरम्यान रेल्वे जात असली असती तर मोठा अपघात घडला असता.
 
 

बातम्या आणखी आहेत...