आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यवतमाळ-नागपूर महामहार्गावर भीषण अपघात.. क्रुझरचा चक्काचूर 7 जण जागेवर ठार तर 8 जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ - समारंभ आटोपून परत कळंबकडे निघालेल्या प्रवाशांच्या क्रुझरला समोरून भरधाव येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात 7 जणांचा जागेवर मृत्यू झाला असून 8 जण जखमी आहेत. ही घटना यवतमाळ-नागपूर मार्गावर असलेल्या चापर्डा या गावाजवळील वळणावर सोमवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली. 

 

कळंब तालुक्यात येणाऱ्या पार्डी या गावातील काही नागरिक सोमवारी एका सभारंभासाठी यवतमाळमध्ये आले होते. कार्यक्रम आटोपून ते रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास गावाकडे परत निघाले होते. दरम्यान, चापर्डा गावाजवळ नागपूरकडून एक ट्रक गॅस सिलिंडर घेऊन येत होता. त्याने भरधाव क्रुझरला धडक दिली. धडक  एवढी भीषण होती की, त्यात क्रुझरमधील 7 जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृतांत एका मुलाचा समावेश आहे. या अपघाताची माहिती मिळताच शेजारच्या गावकऱ्यांनी आणि रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. 

 

घटनेची माहिती मिळताच कळंबचे ठाणेदार नरेश रणधीर यांनी पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या सर्वांनी घटनेतील जखमींना उपचारासाठी यवतमाळ येथील जिल्हा रुग्णालयात रवाना केले, तर मृतदेह कळंब येथील रुग्णालयात पाठवण्यात आले.

 

सोनाली शैलेष बोडाडे (32) आणि रमेश स्थूल (52) अशी मृतांची नाव आहेत. इतर मृतांची अद्याप ओळख पटली नाही. रामकृष्ण जारंडे, सचिन स्थूल, प्रतीक्षा कामडे, प्रशील स्थूल, शंकर अकुलवार, तनोबी स्थूल आणि नितिन रमेश स्थूल गंभीर जखमी आहे. सर्व जण पारडी आणि चापर्डा येथील रहिवासी आहेत.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. अपघाताची भीषणता दाखविणारे फोटो

बातम्या आणखी आहेत...