Home | Maharashtra | North Maharashtra | Jalgaon | Truck hits the back of Jalgaon District President's car

जळगाव जि.प अध्यक्षांच्या कारला ट्रकची मागून धडक; ओझर गावाजवळ घडली घटना

प्रतिनिधी | Update - May 19, 2019, 10:44 AM IST

वर्षभरात अध्यक्षांच्या गाडीचा हा तिसऱ्यांदा अपघात

  • Truck hits the back of Jalgaon District President's car

    जळगाव - पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दुष्काळी दौऱ्यात सहभागी होण्यासाठी जि. प. अध्यक्षा उज्ज्वला पाटील मुंबईहून जळगाव येथे येण्यासाठी निघाल्या असता शनिवारी पहाटे ३ वाजता नाशिकजवळील ओझर गावाजवळ त्यांच्या इनोव्हा कारला ट्रकने पाठीमागून धडक दिली. सुदैवाने यात पाटील यांना किरकोळ दुखापत झाली. मात्र, कारचे नुकसान झाले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा शनिवारी जिल्ह्यात दुष्काळी दौरा असल्यामुळे जि.प. अध्यक्षा उज्ज्वला पाटील, पती माजी जि. प. उपाध्यक्ष मच्छिंद्र पाटील हे मुंबईहून रात्री बारा वाजता जळगावकडे येण्यासाठी निघाले असता ओझर गावाजवळ गतिरोधकावर पाठीमागून येणाऱ्या ट्रकने कारला धडक दिली.


    वर्षात तिसरा अपघात
    यात गाडीचा मागील भाग चेपला. मागच्या सीटवर बसलेला उज्ज्वला पाटील यांचा भाचा सुदैवाने बचावला. किरकोळ दुखापत वगळता कुणासही मोठी दुखापत झाली नाही. दरम्यान, वर्षभरात अध्यक्षांच्या गाडीचा हा तिसऱ्यांदा अपघात झाला आहे.

Trending