आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोल पंपाजवळ लावलेल्या ट्रकांमध्ये अचानक लागली आग, सर्वत्र धूर; लोकांच्या हुशारीने टळली मोठी दुर्घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कानपूर - पेट्रोल पंपाजवळ थांबलेल्या ट्रकांमध्ये शनिवारी अचानक आग लागली. ही उत्तर प्रदेशच्या कानपूर शहरात घडली असून त्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. सुरुवातीला एका ट्रकमध्ये आग लागली होती. त्यानंतर जवळपास थांबलेल्या सर्वच ट्रकांनी पेट घेतला. हे सर्वच ट्रक इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपाजवळ थांबले होते. आग पाहताच कर्मचारी घाबरला आणि तेथून पळ काढला. घटनास्थळी अग्निशमन दलाचे बंब पोहोचले नव्हते. अशात स्थानिकांनीच आपल्या हुशारीने ती आग पेट्रोल पंपाजवळ पोहोचण्यापासून रोखली. काही मिनिटांनंतर अग्निशमन विभागाचे बंब घटनास्थळी पोहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. तोपर्यंत ट्रकांचा कोळसा झाला होता. परंतु, सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नाही.
बातम्या आणखी आहेत...