Home | International | Other Country | trump blames north korea for not finishing their nuclear weapns cancels foriegn minister visit

ट्रम्प म्हणाले, उत्तर कोरियाने Nuclear नष्ट करण्यात दिरंगाई केली, परराष्ट्र मंत्र्यांचा प्योंगयंग दौरा रद्द

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 25, 2018, 12:11 PM IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्या परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांचा उत्तर कोरिया दौरा ऐनवेळी रद्द केला.

  • trump blames north korea for not finishing their nuclear weapns cancels foriegn minister visit

    वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांचा उत्तर कोरिया दौरा ऐनवेळी रद्द केला आहे. उत्तर कोरियाने अण्वस्त्र निशस्त्रीकरण करण्यात विशेष काही करून दाखवलेले नाही. सोबतच, चीन सुद्धा या दिशेने उत्तर कोरियावर दबाव टाकत नाही असे आरोप ट्रम्प यांनी लावले आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, 12 जून रोजी सिंगापूर येथे उत्तर कोरियाचे सुप्रीम लीडर किम जोंग उन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची भेट झाली होती. दोघांनी ही चर्चा यशस्वी ठरल्याचे सांगितले होते. याच मुलाखतीमध्ये आता उत्तर कोरियापासून जगाला धोका नाही असे ट्रम्प यांनी जाहीर केले होते. अशात ट्रम्प यांनीच आपल्या परराष्ट्र मंत्र्यांचा दौरा रद्द करणे धक्कादायक मानले जात आहे.


    ट्रम्प काय म्हणाले?
    ट्रम्प-किम यांच्या भेटीनंतर पॉम्पिओ यांचा हा दुसरा उत्तर कोरिया दौरा ठरणार होता. यापूर्वी पॉम्पिओ यांनी जुलै महिन्यात उत्तर कोरिया दौरा केला होता. दौरा रद्द करताना ट्रम्प म्हणाले, "मी पॉम्पिओ यांना म्हणालो होतो, की सध्या उत्तर कोरियात जाऊ नका. कारण, उत्तर कोरियाने आपले अण्वस्त्र नष्ट करण्यासाठी विशेष काही कामगिरी केल्याचे मला दिसले नाही.'' तर दुसरीकडे हा दौरा रद्द झाल्यानंर अद्याप उत्तर कोरियाची प्रतिक्रिया समोर आली नाही.

Trending