आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्ल्ड बँकेचा अध्यक्ष कोण होणार हे ट्रम्प कन्या इव्हांका ठरवणार! व्हाइट हाऊसने मागितली मदत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंगटन - वर्ल्ड बँकेचे नवीन अध्यक्ष कोण होणार याचा निर्णय आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इव्हांका घेरणार आहे. इव्हांका ट्रम्प यांच्या सल्लागार आहेत. काही दिवसांपूर्वीच इव्हांका वर्ल्ड बँकेच्या अध्यक्ष पदाच्या शर्यतीत असल्याच्या चर्चा होत्या. आता मात्र, त्या अध्यक्ष पदाच्या निवड समितीवरच त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात वृत्त समोर येताच व्हाइट हाऊसने निवड समितीमध्ये त्या एकट्या नाहीत असे स्पष्टीकरण दिले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, कार्यकाळ संपण्यापूर्वीच जिम योंग किम यांनी आपल्या वर्ल्ड बँक अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. ते सलग दुसऱ्यांदा या पदासाठी नियुक्त झाले होते.


वर्ल्ड बँकेच्या निवड प्रक्रियेत अमेरिकेच्या कोषागार विभागाचे प्रमुख स्टीव्हन न्युशिन आणि व्हाइट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ मिक मुलवेनी यांनी इव्हांकाची मदत मागितली. या पदासाठी आलेल्या अमेरिकींच्या उमेदवारींची नावांची छानणी करून यादी तयार करण्याची जबाबदारी इव्हांकावर असणार आहे. दोन वर्षे इव्हांका वर्ल्ड बँकेच्या सल्लागार समितीवर सुद्धा कार्यरत होत्या. त्यांच्या अनुभवाची व्हाइट हाऊस आणि वर्ल्ड बँकेला गरज आहे असे व्हाइट हाऊसच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. सोबतच वर्ल्ड बँकेच्या अध्यक्ष पदाच्या शर्यतीत इव्हांका स्वतः असल्याच्या चर्चा होत्या. त्या व्हाइट हाऊसने फेटाळून लावल्या आहेत.


इव्हांका ट्रम्प 2017 मध्ये महिलांसाठी गोळा केलेल्या निधीवरून चर्चेत आल्या होत्या. त्यांनी सौदी अरेबियाच्या महिला समर्थक योजनेकरिता वर्ल्ड बँकेला 1 अब्ज अमेरिकन डॉलर निधी गोळा करून देण्यासाठी मदत केली होती. परंतु, अमेरिकेच्या कोषागार विभागाने इव्हांका किंवा इतर कुणाच्या उमेदवारीवर अधिकृत प्रतिक्रिया जारी केलेली नाही. त्या जागतिक बँकेच्या अध्यक्ष पदाच्या शर्यतीत असल्याची बातमी लंडनचे प्रसिद्ध दैनिक द फायनान्शिअल टाइम्सने जारी केली होती. वर्ल्ड बँकेने यापूर्वी जारी केलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी महिन्यात उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील. यानंतर एप्रिलमध्ये अध्यक्षाच्या नावाची घोषणा केली जाणार आहे.

 

बातम्या आणखी आहेत...