आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटनच्या दाैऱ्यात महाराणी एलिझाबेथला दिलेली भेटवस्तू ट्रम्प विसरले, पत्नी मेलानियाने आठवण करून दिली, लाेकांनी मात्र उडवली खिल्ली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प यांनी पत्नी मेलानियासाेबत इंग्लंडच्या तीन दिवसांच्या दाैऱ्यावर आहेत. साेमवारी बकिंगहॅम पॅलेसमध्ये महाराणी एलिझाबेथ-२ यांची त्यांनी भेट घेतली. यादरम्यान झालेल्या घटनेत डाेनाल्ड ट्रम्प यांची पत्नी मेलानियाला ट्रम्प यांचा बचाव करणे भाग पडले. ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ-२ ने ट्रम्पना दाखवलेली घाेड्याची प्रतिकृती ते आेळखू शकले नाहीत. त्यावर पत्नी मेलानियाने तत्काळ बाजू सांभाळत सांगितले की, त्यांनीच वर्षभरापूर्वी ही प्रतिकृती महाराणीला भेट दिली हाेती. विशेष म्हणजे, महाराणीने ट्रम्प यांना जाे घाेडा दाखवला हाेता, ताे विंडसर पॅलेसच्या भेटीदरम्यान त्यांनीच महाराणीला गिफ्ट केला हाेता. या वेळी ट्रम्प यांनी महाराणीस एक चित्र भेट दिले आहे. त्याआधी बकिंगहॅम पॅलेसमध्ये ट्रम्प यांचे भव्य स्वागत झाले. त्यांना ग्रीन पार्कमध्ये बंदुकांची सलामी देण्यात आली. ट्रम्प यांच्या तीन दिवसांच्या दाैऱ्याचा एकूण खर्च सुमारे १६५ काेटी रुपये झाल्याचे सांगण्यात येते.


बकिंगहॅम पॅलेसमधील हा घटनाक्रम साेशल मीडियावर दिवसभर ट्राेल झाला. एका युजरने लिहिले की, डाेनाल्ड ट्रम्प व मेलानिया ट्रम्प जगभरातील अन्य विवाहित जाेडप्यांप्रमाणे आहेत. बायका नेहमी गिफ्ट पकडतात. दाेघे मिळून भेटवस्तू साेपवतात, परंतु त्यात काय आहे, याकडे पतीचे लक्ष नसते. मला वाटते प्रत्येक िववाहित जाेडपे असेच असते. आणखी एका युजरने लिहिले की, अमेरिकेतील करदात्यांच्या उत्पन्नातून शाही कुटुंबाला भेट दिली जात आहे. त्यांना आणखी भेटवस्त्ूची गरज नाही. आपण आपल्या पैशाचा वापर आवश्यक वस्तूंसाठी केला पाहिजे.


ट्रम्पना सव्वा लाख रुपयाची वाइन व २५० प्रकारचे पदार्थ तयार केले
ट्रम्प यांच्या सन्मानार्थ शाही मेजवानीत एकूण १७० पाहुणे सहभागी झाले हाेते. १९९० मध्ये तयार जवळपास सव्वा 
लाख रुपयांची वाइनही सर्व्ह केली. जेवणात २५० प्रकारचे पदार्थ वाढण्यात आले. स्टार्टरमध्ये हलिबेट व कोकराचे मांस दिले. डेझर्टमध्ये स्ट्राॅबेरी क्रीम बिस्किटपासून तयार पदार्थ दिला.