आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Trump Gives Bizarre Advice To Block Refugees: 'Shoot In The Foot, Push Into The Valley Of Snakes'

निर्वासितांना रोखण्यासाठी ट्रम्प यांनी दिले होते विचित्र सल्ले :‘पायात गोळी मारा, सापांच्या दरीत ढकलून द्या’

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकेत निर्वासित येऊ नयेत यासाठी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी विचित्र सल्ला दिला होता. यात काटेरी भिंत उभारणे, निर्वासितांना मगरी आणि साप असलेल्या दरीत टाकणे आणि पायात गोळी मारणे यासारखे उपाय होते.

हा दावा न्यूयाॅर्क टाइम्सचे वार्ताहर मायकेल शिअर आणि ज्युली डेव्हिस यांच्या नुकत्याच प्रकाशित पुस्तकात करण्यात आला आहे. पुस्तकाचे नाव आहे ‘बॉर्डर वॉर्स : इनसाइड ट्रम्प्स असाॅल्ट आॅन इमिग्रेशन.’ यात अनेक अधिकाऱ्यांसोबत झालेल्या मुलाखतीनंतर ही माहिती देण्यात आली. मेक्सिको सीमेवर भिंत बांधणे ट्रम्प यांचा मुख्य अजेंडा होता. कामास सुरुवातही झाली होती. पेंटागॉनने यासाठी २५,६०० कोटी रुपये मंजूरही केले होते. सांगण्यात आले आहे की, या वर्षी मार्चमध्ये ट्रम्प निर्वासितांबाबत आक्रमक झाले होते. त्यांना दक्षिणेकडून होणारी वर्दळ थांबवण्यासाठी त्यांनी सर्व उपाय करण्याचे आदेश दिले होते. त्यांनी वैयक्तिक पातळीवर सल्ला दिला होता की, सैनिकांनी निर्वासितांच्या पायावर गोळी मारावी. मात्र, त्यांना हे बेकायदेशीर होईल, असल्याचे सांगण्यात आले. सीमेवर पाण्याने भरलेला मोठा खड‌्डा जवळच असलेली भिंत बांधायलाही त्यांनी सांगितले होते. त्याच्यात साप आणि मगरीही असाव्यात. भिंतीमध्ये वीजप्रवाह सतत वाहता असावा असेही त्यांना वाटत होते.  सल्लागारांसोबतच्या बैठकीनंतर दुसऱ्याच दिवशी ट्रम्प यांनी सीमा बंद करण्याचे आदेश दिल्याचे पुस्तकात म्हटले आहे.
 

ट्रम्प म्हणाले होते- मी हे करेनच
ओव्हल कार्यालयात ट्रम्प आणि सल्लागारांची बैठक सुमारे दोन तास चालली होती. यात ट्रम्प यांना समजावण्याचा प्रयत्न झाला. यावर ट्रम्प अधिकाऱ्यांना ओरडत म्हणाले होते की, तुम्ही मला मूर्ख समजत आहात, हा माझा मुद्दा आहे, तो मी अमलात आणेनच. लवकरच तुम्हाला त्यावर अंमलबजावणी झालेली दिसेल.