आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रम्प-मोदी चर्चेत काश्मीरचा मुद्दाच नव्हता : अमेरिका

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीरबाबत केलेल्या विधानाबद्दल कोणतेही अधिकृत नोंद उपलब्ध नाही, असा खुलासा अमेरिकी प्रशासनाने केला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या उपस्थितीत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्नी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला मध्यस्थी करण्यास सांगितले होते, असा दावा केला होता. अमेरिकी प्रशासनाने मात्र त्यांच्या या वक्तव्याकडे पाठ फिरवली आहे. याबाबत व्हाइट हाऊसमध्ये अधिकृत रेकॉर्ड नसल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. दरम्यान, या मुद्द्यावर वादंग उठवणारे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र काहीही खुलासा केलेला नाही. 


मंगळवारी संसदेतही प्रचंड गोंधळ झाला. मोदींनी यावर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी करत विरोधी पक्षांनी सभात्याग केला. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी राज्यसभा व लोकसभेतही यावर स्पष्टीकरण देताना मोदी यांनी ट्रम्प यांच्याशी काश्मीरप्रश्नी चर्चा केलीच नव्हती, असा दावा केला. 

बातम्या आणखी आहेत...