आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Trump Receives $ 106m In Donations Within 72 Hours After The Investigation Began, Spending 115c On Facebook Ads This Year

तपास सुरू झाल्यानंतर 72 तासांत ट्रम्प यांना मिळाल्या 106 रुपये काेटी देणग्या, या वर्षी फेसबुक जाहिरातींवर 115 काेटी रुपये खर्च

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • समाज माध्यमांच्या मंचाचा दुहेरी उपयाेग, प्रचाराच्या माध्यमातून महाभियाेग आपल्या बाजूने वळवण्याचा केला प्रयत्न
  • डाेनाल्ड ट्रम्प म्हणाले, संसदेची सुनावणी म्हणजे फसवणूक

अमेरिकेचे राष्ट्रपती डाेनाल्ड ट्रम्प यांनी संसदेत त्यांच्याविराेधात सुरू असलेल्या महाभियाेगाचा निवडणुकीसाठी निधी गाेळा करण्याचा एक मार्ग बनवला आहे. ते आपल्या समर्थकांची एकजूट करत आहेत. सभागृहामध्ये महाभियाेग तपास नियमांना मंजुरी दिल्याच्या दिवशी ३१ अाॅक्टाेबरला त्यांनी २१ काेटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळवली. ७२ तासांच्या आत लहान देणग्यांद्वारे ट्रम्प अभियानच्या खात्यात १०६ काेटी रुपये जमा झाले. या वर्षात त्यांनी फेसबुक जाहिरातींवर आतापर्यंत ११५ काेटी रुपये खर्च केले आहेत. सभागृहाच्या सभापती नेन्सी पेलाेसी यांनी ट्रम्प यांच्याविराेधात तपास करण्याची घाेषणा केल्यावर राष्ट्रपती निवडणुकीच्या व्यवस्थापकांनी फेसबुक, इन्स्टाग्राम आणि अन्य समाज माध्यमांच्या मंचावर दुहेरी रणनीती स्वीकारली आहे. डेमाेक्रॅटिक पक्षाच्या महाभियाेग प्रस्तावामध्ये ट्रम्प यांच्यावर राजकीय प्रतिस्पर्ध्याची चौकशी करण्यासाठी युक्रेनवर दबाव आणण्यासाठी पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप आहे. ट्रम्प यांच्या शस्त्रांमध्ये फेसबुक हे सर्वात भक्कम अस्त्र आहे. यात उमेदवारांच्या राजकीय जाहिरातींची पुष्टी केली जात नाही. बऱ्याच वाहिन्या व वर्तमानपत्रे असे करतात.पेलाेसी यांच्या घाेषणेनंतर येणाऱ्या आठवड्यांमध्ये ट्रम्प यांनी फेसबुक जाहिरातींवर ३८ काेटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम खर्च केली अाहे. त्यामुळे वापरकर्त्यांच्या फीडवर दहा काेटी वेळा त्यांचा उल्लेख झाला. टाइम मासिकाच्या समाज माध्यमांच्या विश्लेषणातून असे दिसून आले की दाेन तृतीयांश रक्कम अशा जाहिरातींवर खर्च करण्यात आली. त्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष महाभियाेगाचा उल्लेख अाहे. जाहिरात माेहिमेशी अनेक मुद्दे जाेडले आहेत. मतदारांपर्यंत पाेहोचण्यासाठी ट्रम्प अशा मंचाचा उपयाेग करत आहे, ज्याचा वापर २०१६ च्या निवडणुकीत रशियाने केला हाेता. ट्रम्प निवडणूक माेहिमेचे समन्वयक संचालक टिम मुर्टाग म्हणाले, जेव्हा जेव्हा महाभियोगाची बातमी येते तेव्हा राष्ट्रपतींची बाजू भक्कम हाेते. परंतु राष्ट्रीय जनमत सर्वेक्षण त्याची पुष्टी करत नाही. बहुतांश सर्वेक्षणांत महाभियाेगाच्या समर्थनामध्ये विराेधाच्या तुलनेत पाच गुण जास्त मिळाले अाहेत. गॅलपच्या सर्वेक्षणानुसार ट्रम्प यांचे धाेरण व कामकाजाचे ४३ टक्के अमेरिकनांनी समर्थन केले आहे. ट्रम्प समाज माध्यमांचा शस्त्र म्हणून वापर करत असल्याचे सर्वांना माहिती आहे. १३ नोव्हेंबर रोजी तपासाच्या खुल्या सुनावणीच्या पहिल्या दिवशी ट्रम्प यांच्या जाहिरातींमध्ये महाभियोग घोटाळ्याची सुनावणी आजपासून सुरू झाली आहे. हे पूर्णपणे बनावट आहे. रिपब्लिकन पार्टी या प्रकरणात अध्यक्षांसमवेत आहे. आमच्याकडे सिनेटमध्ये बहुमत असल्याची पक्षाच्या नेत्यांना खात्री आहे. महाभियोग पास होणार नाही. फाेरिडा सनराईझ रॅलीत ट्रम्प यांनी कट्टर डेमाेक्रॅट वेडे आहेत, ते गुंतागुंतीचा तपास पुढे वाढवून अापल्या देशाचे तुकडे करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा आराेप केला.

फेसबुक जाहिरातींवर खर्च करण्यात ट्रम सर्वात अाघाडीवर

डाेनाल्ड ट्रम्पप्रमाणेच अन्य उमेदवार समाज माध्यमांच्या जाहिरातीवर खूप खर्च करत असल्याचे जाहिरातींच्या डेटावरून कळते. परंतु सर्वात जास्त खर्च ट्रम्प यांनी केला आहे. टाॅम स्टेअरने १०० काेटी रु. पीट बुटीगिएग ४२ काेटी रु., एलिझाबेथ वाॅरेन ३५ काेटी रु, बनी सेंडर्स ३४ काेटी रु. आणि जाे बायडेनने २२ काेटी रुपये खर्च केले आहेत.

तपासाची घोषणा झाल्यावर जाहिरातींचा पाऊस सुरू झाला

- २४ सप्टेंबर -नेन्सी पेलोसींनी महाभियोग चालवण्याचा निर्णय जाहीर केला.
- ३.५ मिनिटांनंतर- ट्रम्प यांनी ट्विट केले- बदल्याचा कचरा
- २३ सेकंदांनंतर - ट्रम्प यांनी फेसबुकवर जाहिरातींचा पाऊस पाडला. संदेश हाेता
- देशभक्त अमेरिकीच राष्ट्रपती ट्रम्प यांना साथ देत डेमाेक्रॅट्सना त्यांच्या बदल्याच्या महाभियाेगापासून राेखू शकतात
- २० मिनिटांनंतर- ट्रम्प अभियानने २० लाख फेसबुक युजर्सना लक्ष्य करत ७० लाख रुपये खर्च केले.
- २७ सप्टेंबर- घाेषणेच्या ७२ तासांनंतर ट्रम्प यांनी १ काेटी ६० लाख वेळा दाखवलेल्या फेसबुक जाहिरातीवर ९ काेटी ९० लाख खर्च केले.

युजर्सला लक्ष्य केले

- तपासानंतर ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या फेसबुक युजर्सना लक्ष्य करणाऱ्या जाहिरातींची संख्या वाढवली.
- १८ ते ४४ वयाेगटातल्या लाेकांना लक्ष्य करणाऱ्या जाहिरातींमध्ये घट.
(टाइम आणि टाइम लोगो टाइमचा नाेंदणीकृत ट्रेडमार्क आहे. याचा उपयाेग करारानुसार करण्यात अाला अाहे.)
 

बातम्या आणखी आहेत...