आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता व्हिएतनाममध्ये भेटणार किम जोंग उन आणि डोनाल्ड ट्रम्प; 8 महिन्यातील दुसरी ऐतिहासिक भेट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे सुप्रीम लीडर किम जोंग उन 27-28 फेब्रुवारी रोजी व्हिएतनाममध्ये भेटणार आहेत. 8 महिन्यांत किम आणि ट्रम्प यांची ही दुसरी भेट आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्या स्टेट ऑफ द युनियन भाषणात यासंदर्भात अधिकृत घोषणा केली आहे. यापूर्वी जगातील सर्वात कट्टर शत्रू राष्ट्रांचे नेते 12 जून 2018 रोजी को सिंगापूरमध्ये एकमेकांना भेटले होते. दोन्ही नेत्यांमध्ये 90 मिनिटे चर्चा झाली, परंतु, काहीही तोडगा निघाला नाही. त्यामुळे, दुसऱ्यांदा चर्चेचा प्रयत्न केला जात आहे.


ट्रम्प म्हणाले, की उत्तर कोरियासंदर्भात अजुनही खूप काम बाकी आहे. पण, किम जोंग उन यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत. याबरोबरच, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदी पुन्ही आपलीच निवड झाली नाही तर उत्तर कोरियासोबत युद्ध सुद्धा भडकू शकते असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. ट्रम्प-किम यांची भेट व्हिएतनाममध्ये होणार हे निश्चित झाले आहे. परंतु, व्हिएतनामचे ठिकाण अजुनही निश्चित झालेले नाही. अमेरिकन माध्यमांच्या वृत्तानुसार, व्हिएतनामची राजधानी हनोई किंवा तटवर्ती शहर दा नांग यापैकी एका ठिकाणी चर्चा होऊ शकते. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, अमेरिकेचे वरिष्ठ प्रतिनिधी स्टीफन बीगन याबाबत उत्तर कोरियाचे प्रतिनिधी किम ह्योक चोल यांच्या संपर्कात आहेत.

बातम्या आणखी आहेत...