आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुटबॉल संघाला ट्रम्प यांनी फास्टफूड केले सर्व्ह; अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी बर्गर, फ्राइज व पिझ्झाने विजेत्या खेळाडूंचे केले स्वागत 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्रपती डआनाल्ड ट्रम्प यांनी सआमवारी राष्ट्रीय महाविद्यालयीन फुटबॉल चॅम्पियन संघ क्लेमसन टायगर्सना व्हाइट हाऊसमध्ये फास्टफूडची पार्टी दिली. या पार्टीत त्यांनी स्वत:च खेळाडूंना खाद्यपदार्थ वाढले. गत आठवड्यात क्लेमसन टायगर्स संघाने अलाबामा संघाला पराभूत करून विजेतेपद पटकावले होते. 

 

शटडाऊनमुळे व्हाइट हाऊसमधील स्वयंपाकी स्टाफ कमी झाला आहे; अन्यथा मोठी पार्टी दिली असती. तथापि, या पार्टीत मी तुमचे ३०० पेक्षा जास्त बर्गर, फ्राइज व पिझ्झांसआबत स्वागत करतो. हे सर्व फास्टफूड मला खूप आवडतात. शटडाऊनमुळे खेळाडूंची ही पार्टी रद्द करण्याची माझी इच्छा नव्हती. त्यामुळे या फास्टफूड पार्टीचा सर्व खर्च मी माझ्या खिशातून केला आहे, असे या वेळी ट्रम्प यांनी विजेत्या संघाला सांगितले. दरम्यान, ट्रम्प यांची मेक्सिकआ सीमेवर भिंत उभारण्याची इच्छा आहे. त्यासाठी त्यांनी संसदेकडे सुमारे ३५ हजार कआटी मागितले; परंतु विराधी पक्षांनी त्यांची ही मागणी फेटाळून लावली आहे. या वादामुळे सरकारचा अर्थसंकल्प मंजूर झालेला नाही. याच कारणामुळे अमेरिकेत शटडाऊन सुरू आहे. परिणामी, सुमारे ८ लाख सरकारी कर्मचाऱ्यांना विनावेतन सुटीवर पाठवले आहे. 

 

शटडाऊनमुळे १२ पैकी ९ सरकारी विभाग ठप्प 
विभाग - सुटीवरील कर्मचारी 

होमलँड सिक्युरिटी- 245405 
व्यापार- 113546 
कृषी- 95383 
कआषागार- 87086 
इंटेरियर- 76294 
परिवहन- 54179 
व्यापार- 45990 
पर्यावरण- 19972 
शहरी विकास- 7497 

 

स्रात : अमेरिकी माहिती विभाग 
 

बातम्या आणखी आहेत...