अमेरिका / ट्रम्प यांना देशाचे विभाजन करायचे आहे, महाभियोग आणून त्यांना त्वरित हटवा : अमेरिकी संसदेच्या सभापती, महिला खासदार

आपले चुकीचे मनसुबे पूर्ण करण्यासाठी ट्रम्प यांना घाबरलेली अमेरिका हवी आहे : कार्टेेज​​​​​​​

वृत्तसंस्था

Jul 16,2019 09:52:00 AM IST

वॉशिंग्टन - अमेरिकी प्रतिनिधीगृहाच्या सभापती नॅन्स पॅलोसी यांनी म्हटले आहे की, जेव्हा ट्रम्प अमेरिकी काँग्रेसच्या ४ महिलांना आपल्या देशात परत जाण्यास सांगतात तेव्हा त्यांची ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ची योजना स्पष्ट होते. ते अमेरिकेला ‘व्हाइट’ बनवू इच्छितात. विविधता हीच आपली ताकद आहे. पॅलोसी यांचे हे वक्तव्य ट्रम्प यांनी केलेल्या वांशिक टिप्पणीनंतर आले आहे. ट्रम्प यांनी रविवारी काँग्रेसच्या डेमॉक्रॅटिक पक्षाच्या चार महिला खासदारांना म्हटले होते की, त्या ज्या देशातून आल्या आहेत, तेथे त्यांनी परत जावे. त्यांनी लिहिले,‘या देशांची सरकारे पूर्ण बरबाद झाली आहेत. त्यांनी तेथे जाऊनच सूचना कराव्यात.’


ट्रम्प यांचे हे वक्तव्य अमेरिकेतील विविध वंशाच्या लोकांना धोका असल्याच्या रूपात पाहिले जात आहे. सोमवारी संसदेत अलेक्झांड्रिया ओकासियो कार्टेज,रशिदा तलेब, इल्हान उमर आणि अयान प्रेस्ले यांनी या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली.

आपले चुकीचे मनसुबे पूर्ण करण्यासाठी ट्रम्प यांना घाबरलेली अमेरिका हवी आहे : कार्टेेज

स्पीकर नॅन्सी पेलोसी यांनी ट्विट केले की, ट्रम्प यांच्या टिप्पण्या उन्मादी आहेत, ते देश विभाजनाचे काम करत आहेत. काँग्रेसच्या सदस्यांवर हल्ला करण्याऐवजी त्यांनी आमच्यासोबत येऊन इमिग्रेशन धोरणावर काम करावे, त्यात अमेरिकेची मूल्ये दिसतात. मिशिगन १३ डिस्ट्रिक्टच्या खासदार रशिदा तलैब यांच्या मते, ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालवला जावा. त्यांची विचारसरणी धोकादायक आहे. त्यांना तत्काळ हटवले जावे.


अलेक्झांड्रिया कार्टेज यांनीही ट्रम्प यांच्यावर पलटवार केला. त्या म्हणाल्या की, ते रागात आहेत कारण त्यांनी अशा अमेरिकेची कल्पना केली नव्हती ज्यात आमच्यासारख्या महिलाही आहेत.अमेरिकेतील लोकांनी आम्हाला निवडले आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आम्ही तुम्हाला घाबरत नाही ही गोष्ट तुम्हाला टोचत आहे. तुम्हाला तुमचे चुकीचे मनसुबे पूर्ण करायचे आहेत. त्यामुळे तुम्हाला घाबरलेली अमेरिका हवी आहे.


खासदार इल्हान उमर म्हणाल्या की, ट्रम्प बळजबरीने श्वेत राष्ट्रवाद लादत आहेत. कारण आमच्यासारखे लोक देशाची सेवा करत आहेत, त्यांच्या द्वेषपूर्ण अजेंड्याविरोधात लढत आहेत, हे त्यांना आवडत नाही. खासदार अनाया प्रेस्ले यांनी ट्रम्प यांच्या ट्विटचा स्क्रीनशॉट घेऊन पोस्ट केला. त्यासोबत त्यांनी लिहिले,‘श्वेत राष्ट्रवाद असा दिसतो’ आणि आमच्यात लोकशाही आहे.

X
COMMENT