आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त करण्याचा अध्यक्ष ट्रम्प यांचा तुर्कस्तानला इशारा...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कुर्द फौजांवर हल्ला चढवल्यास आर्थिकदृष्ट्या उद््ध्वस्त करू, असा इशारा तुर्कस्तानला दिला आहे. अमेरिकेने सिरियातून आपल्या फौजा मागे घेतल्यानंतर ट्रम्प यांनी हा इशारा दिला आहे. त्याच वेळी त्यांनी कुर्दांनी तुर्कस्तानला चिथावणी देऊ नये, असे आवाहनही केले आहे.  


ट्रम्प यांनी गेल्या डिसेंबरमध्ये सिरियातून अमेरिकी फौजा परत घेण्याचा अचानक निर्णय घेतल्यानंतर टि्वटरवरून यासंदर्भात मतप्रदर्शन केले आहे. सिरियातून अमेरिकेने काढता पाय घेतल्यानंतर अमेरिका व कुर्दांसोबतच्या संबंधावरून तुर्कस्तान व अमेरिकेतील संबंधात तणाव निर्माण झाला आहे. हा तणाव निवळावा यासाठी अमेरिकी मुत्सद्दी माइक पॉम्पिओ सध्या मध्य पूर्वेच्या दौऱ्यावर आहेत. याच बरोबर आयएसविरुद्धच्या लढ्यात कुर्दांसोबत अमेरिका राहील, असे आश्वासन पॉम्पिओ देऊ इच्छितात. कुर्द फौजांना अमेरिकेचे पाठबळ आहे. मात्र, तुर्कस्तान कुर्दांना दहशतवादी संबोधते. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी टि्वटमध्ये तुर्कस्तानला इशारा देत सांगितले की, कुर्दांवर हल्ला झाल्यास त्यांना (तुर्कस्तान) आर्थिकदृष्ट्या उद््ध्वस्त करू. ट्रम्प यांनी यासाठी ३० किमीच्या सुरक्षित क्षेत्रासाठी पैरवी केली. याबरोबर कुर्दांनीही तुर्कस्तानला चिथावणी देऊ नये, अशी समज दिली. सुरक्षित क्षेत्र कुठे आणि  कसे असावे. त्यासाठी कोण पैसे खर्च करणार हे ट्रम्प यांनी स्पष्ट केले नाही.  


सिरियात आयएसविरुद्धच्या लढ्यात अमेरिकेला कुर्द फौजांनी मदत केलेली आहे.  कुर्दिश पीपल्स प्रोटेक्शन युनिट्सला (वायपीजी) तुर्कस्तान एक दहशतवादी गट मानते. हा गट कुर्दिस्तान वर्कर्स पार्टीशी (पीकेके) संबंधित आहे. कुर्दांनी तुर्कस्तानात घुसखोरी केल्याचा तुर्कांचा आरोप आहे.  

बातम्या आणखी आहेत...