आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रम्पचा भर सक्षम महिलांच्या खच्चीकरणावर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कावेरी बामजई  (वरिष्ठ पत्रकार) अमेरिकेत ७७ वर्षीय जो बिडेन हे ७३ वर्षीय राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना डेमाेक्रॅटिक पक्षातर्फे आव्हान देतील हे स्पष्ट झाले आहे. डेमाेक्रॅट्सकडे  कॅलिफोर्नियाच्या सिनेटर कमला हॅरिस, मॅसाच्युसेट्सच्या सिनेटर एलिझाबेथ वाॅरेन, मिनेसोटाच्या सिनेटर अॅमी क्लोबचर, न्यूयाॅर्कच्या सिनेटर क्रिस्टेन गिलिब्रँड आणि लेखिका मरियाने विल्यम्सन यांसारख्या स्मार्ट महिला उमेदवार होत्या, पण बिडेन यांचीच निवड झाली हे त्यातून सिद्ध होते. महिलांशी गैरवर्तन करण्यासाठी प्रसिद्ध असलेले ट्रम्प यांच्याविरोधात या लढतीत डेमाेक्रॅट्सना माजी उपराष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्यापेक्षा चांगला उमेदवारच मिळाला नाही. हाॅलीवूडमधील सेलिब्रिटी हार्वे विन्स्टीन याला काही दिवसांपूर्वी लैंगिक शोषणासाठी २३ वर्षांचा तुरुंगवास झाला असल्याची पृष्ठभूमी असतानाही हे घडले. काँग्रेसमध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येत महिला असण्याची ही पहिलीच वेळ आहे.  ट्रम्प यांची चार वर्षांची कारकीर्द पूर्ण होत असताना सार्वजनिकपणे महिलांशी गुंडगिरी करणे हा खेळ म्हणून स्वीकारण्यात आला आहे आणि त्यासाठी स्वत: ट्रम्प यांनी परवानगी दिली आहे. ट्रम्प यांच्या ट्विटर अकाउंटवर नजर टाकल्यास ते महिलांबाबत काही चांगले बोलत नाहीत असे जाणवते. अपवाद फक्त त्यांची मुलगी इव्हांकाचा. बरेचदा तर त्यांनी मुलीबाबतही सेक्शुअल काॅमेंट्स केल्या आहेत. त्यांना प्रतिनिधीगृहाच्या सभापती नॅन्सी पॅलोसी पसंत नाहीत. फाॅक्स न्यूजची स्टार अँकर मॅगिन केली हिने माझी मुलाखत घेतली तेव्हा ती पीरियड्समध्ये होते, असे जाहीर वक्तव्य त्यांनी केले आहे. २०१६ मधील डेमाेक्रॅटिक उमेदवार आणि प्रतिस्पर्धी हिलरी क्लिंटन यांना ते ‘कुटिल हिलरी’ असे संबोधतात. त्यांचे माजी सहकारी राॅब पोर्टर यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप झाले तेव्हा ट्रम्प यांनी ट्विट केले, ‘लोकांचे आयुष्य फक्त एक आरोप झाल्याने उद्ध्वस्त होते. काही आरोप खरे असतात, तर काही खोटे. काही जुने आणि काही नवे. खोट्या आरोपांतून काही साध्य होत नाही, आयुष्य आणि कारकीर्द नष्ट झाली. सध्याच्या नियम-कायद्यांशी संबंधित कुठलीही प्रक्रिया शिल्लक नाही का?’ आपण महिलांचा सन्मान करतो आहोत असे ते दाखवत होते तेव्हा ट्रम्प यांनी हे लिहिले, म्हटले आणि ते पोस्ट केले. ‘आॅल द प्रेसिडेंट्स वुमन : डोनाल्ड ट्रम्प अँड द मेकिंग आॅफ द प्रिडेटर’ या नव्या पुस्तकात त्यांच्याविरोधात लैंगिक छळाच्या ४३ आरोपांशी संबंधित माहिती आहे. ‘महिला कामचोर असतात, त्या घृणित प्राणी आहेत’ अशी टिप्पणी ट्रम्प यांनी महिलांबाबत केली होती. त्यामुळे सार्वजनिक तर्क एवढ्या खालच्या मर्यादेपर्यंत गेले की आता जो बिडेन यांच्यासारख्या लोकांना सेक्सिझमही स्वीकारार्ह आणि सामान्य दर्जाचे वाटते. बिडेन महिलांच्या पसंतीचे उमेदवार म्हणून समोर आले आहेत. शेकडो अमेरिकी महिलांना विम्याच्या लाभापासून विन्मुख करणाऱ्या हेल्थ केअर पाॅलिसीला पाठिंबा िदला असतानाही हे घडले आहे हे विशेष. या पाॅलिसीत फक्त १२ आठवड्यांच्या पेड फॅमिली लीव्हची तरतूद आहे, चाइल्ड केअरची नाही. एवढेच नाही तर त्यांनी ‘व्हायलन्स अगेन्स्ट वुमन अॅक्ट’सारख्या कायद्याचेही समर्थन केले आहे. या कायद्यामुळे अमेरिकेच्या कमजोर महिलांची सुरक्षा होण्याएेवजी गुन्हेगारीकरणाला प्रोत्साहन मिळेल, असे तज्ञांचे मत आहे. ‘पाॅलिटिको’ या नियतकालिकानुसार, ट्रम्प फक्त महिलांच्या विरोधात बोलतात असे नाही तर त्यांचे व्यवस्थापन महिलांचे हक्क नाकारण्यासाठी काम करत आहे. शिक्षण विभागाने लैंगिक छळाच्या आरोपी विद्यार्थ्यांना जास्त सुरक्षा देण्याचे उपाय आपल्या धोरणांत समाविष्ट केले आहेत. जेंडर पे गॅप नष्ट करण्यासाठी बनवलेले नियम स्थगित करून त्यांनी वर्किंग वुमन आणि त्यांच्या कुटुंबीयांवर निशाणा साधला आहे. लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या ब्रेट कावानाह यांना सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तिपदासाठी ट्रम्प यांनी नाॅमिनेट केले आहे.   व्हाइट हाऊसमध्ये सेक्सिझम नवी गोष्ट नाही. राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी आपली इंटर्न मोनिका लेविन्स्कीसोबत अफेअर केले होते, त्यामुळे तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. कामाचा तणाव कमी करण्यासाठी हे संबंध ठेवले होते, असे स्पष्टीकरण आजही क्लिंटन देतात. त्यांच्याआधीही राष्ट्राध्यक्ष जाॅन एफ. केनेडींचा व्यभिचार प्रसिद्ध होता, त्यांच्या पत्नीने तो स्वीकारला होता आणि पत्रकारांनीही त्याकडे डोळेझाक केली होती. तेव्हा ज्याला व्यभिचार मानले जात होते त्याला आता स्त्रीद्वेष आणि सेक्सिझम म्हटले जाते. केलियान कोन्वे किंवा सराह हकाबी सँडर्स यांसारख्या सक्षम आणि प्रतिभावंत महिलांनी त्यांना अनेकदा वाचवले असतानाही विषारी पुरुषवाद हा ट्रम्प यांच्या वक्तव्यांचा अविभाज्य भाग झाला आहे. ट्रम्प महिलाविरोधी का झाले आहेत आणि त्यामुळे अमेरिका महिलांसाठी विषारी का झाली आहे?   वस्तुस्थिती अशी आहे की, महिलांनी कितीही प्रगती केली तरी विन्स्टीन यांच्यासारख्या काही दुष्कर्मींची विचारसरणी बदलणे कठीण आहे. काही दिवसांपूर्वी शिक्षा सुनावली जात असताना तो म्हणाला होता की, ‘मीटूच्या प्रकरणात लढाई लढणाऱ्या पुरुषांची मला कीव येत आहे. महिलांसोबतच्या संबंधांच्या अटींवर पुन्हा चर्चा करावी लागते तेव्हा अनेक पुरुषांवर नव्या जगात दबाव जाणवतो. सबल महिलांना सार्वजनिक ठिकाणी शिव्या देणारे ट्रम्प आणि महिला-मुलींना वाईट हेतूने स्पर्श करणारे बिडेन यांच्यासारखे लोक मला आकर्षित करतात.’ जे आपल्यासाठी शक्तिशाली आदर्श शोधत असतात असे तरुण ट्रम्प यांची वर्तणूक आदर्श आहे असे समजण्याची चूक करू शकतात.