आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रम्प यांच्या ट्विटर फिडवर द्वेष, असत्य, वंशवादाशी निगडीत प्रचाराचा बाेलबाेला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटर या साेशल मिडीयाला अापल्या राजकीय अजेंड्याचे अतिरंजीत अाणि खाेटारड्या प्रचाराचे माध्यम बनवून ठेवले अाहे. त्यांच्या अकाऊंटवर द्वेष-तिरस्कार, वंशवादाला उत्तेजन देणाऱ्या संदेशाचे प्रमाण सर्वाधिक अाहे. जे अकाऊंट संशयास्पद अाहेत, त्यावरील संदेश देखील ते रिट्विट करतात. अशा संदेशाच्या माद्यमातून श्वेतवर्णिय राष्ट्रवाद, मुस्लिम विराेधी प्रचाराचे समर्थन करण्यासाेबतच डेमाेक्रॅटिक राजकीय नेत्यांच्या विराेधात अफवा पसरवतात. डाेनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपद स्वीकारल्यापासून त्यांच्या ११ हजारांहून अधिक ट्विट अाणि ज्यावरून ते रिट्विट करतात अशा शेकडाे अकाऊंटचे न्यूयाॅर्क टाइम्सने विश्लेषण केले. याद्वारे असे निदर्शनास अाले की, ट्रम्प सर्वाधिक वेळ दहशतवादी, हेर, ज्यांचे फेक अकाऊंट अाहेत अशा लाेकांशी संवाद साधण्यात अधिक वेळ घालवतात. चीन, ईराण अाणि रशियाच्या गुप्तचर संस्थांशी संबंधित फेक अकाऊंटद्वारे ट्रम्प यांना हजाराे ट्विट पाठवले अाहेत. रशियन अकाऊंटवरून ३० हजार पेक्षाही अधिक वेळा ट्रम्प यांना टॅग करण्यात अाले अाहे. ट्रम्प यांनी अशा एका बनावट रशियन अकाऊंटला रिट्विट केले ज्यात म्हटले अाहे, 'राष्ट्राध्यक्ष, अाम्ही तुमच्यावर प्रेम करताे'. १४५ पेक्षा अधिक संशयित अकाउंटचे संदेश त्यांनी रिट्विट केले अाहेत. यापैकी एक अज्ञात अकाउंट वीबी नॅशनलिस्ट. डेमाेक्रॅटिक पक्षाचे नेते सैतानाची पूजा घालतात अाणि मुलांचे लैंगिक शाेषण करतात असा खाेटा प्रचार या अज्ञात अकाउंटवरून करण्यात अाला हाेता. ट्विटरने २४ पेक्षाही अधिक अशातऱ्हेचे अकाउंट बंद केले अाहेत. श्वेतवर्णियांच्या श्रेष्ठत्वाचा पुरस्कार करणारे वंशवादी लाेक ट्रम्प यांच्या संदेशाची प्रशंसा करतात. ट्रम्प यांनी जेव्हा दक्षिण अाफ्रिकेतील श्वेतवर्णिय शेतकऱ्यांचे समर्थन केले तेव्हा, 'डाेनाल्ड इज किंग, काेणीही कृष्णवर्णिय चांगल्या प्रकारे शेती करू शकत नाही', असा संदेश व्हायरल झाला हाेता. ट्रम्प यांनी एकंदर २१७ अकाउंटला रिट्विट केले अाहे, ज्या ट्विटरने दुजाेरा दिलेला नाही. यापैकी १४५ अकाउंटवरून घातपाती अाणि कारस्थानी मजकूर पाठवला गेला अाहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्षांना ४७ अकाउंटवरून आक्षेपार्ह कंटेंट मिळताे. यामध्ये काही त्यांचे नातेवाईक, सेलिब्रिटी, फाॅक्स न्यूज अंॅकर अाणि रिपब्लिकन पक्ष नेत्यांचा समावेश अाहे. यापैकी काही जण क्यूएएनअाेएन किंवा इस्लामविराेधी अथवा श्वेत राष्ट्रवादी विचारांचा पुरस्कार करणाऱ्या अकाउंटला फाॅलाे करतात. क्यूएएनअाेएन या अकाउंटवरून श्वेतवर्णिय समर्थक अाणि कट-कारस्थानाची भूमिका मांडली जात असते. ट्रम्प यांनी २०१७ साली उजव्या विचारसरणीच्या ब्रिटीश व्यक्तीचे तीन व्हिडीअाे रिट्विट केले हाेते. ट्रम्प यांचे ट्विट-२० जानेवारी २०१७ ते १५ अाॅक्टाेबर २०१९ (अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या ट्विटची आकडेवारी आणि विषय) ५८८९ - एखाद्यावर टीका ४८७६ - एखाद्याची प्रशंसा २४०५ - डेमाेक्रॅट नेत्यांवर हल्ले २०२६ - सरकारी तपासावर टीका १७१० - कट पसरवणाऱ्या बातम्या १३०८ - वृत्त संस्थांवर हल्ले ८५१ - अल्पसंख्यकांवर प्रहार ५७० - विदेशी नागरिकांवर टीका ४५३ - माजी राष्ट्राध्यक्षांवर हल्ले २५६ - हिलरी क्लिंटनवर अागपाखड १३२ - हुकूमशहांची प्रशंसा ४० - मतदार फसवणुकीच्या पद्धती ३६ - वृत्त माध्यमे जनतेच्या शत्रू १६ - स्वत: सर्वश्रेष्ठ राष्ट्राध्यक्ष  

बातम्या आणखी आहेत...