आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे 'निरमा वॉशिंग पावडर'च्या पॅकेटवर असलेल्या मुलीच्या फोटोची कहाणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क - 90 च्या दशकात लोकांचे आयुष्य दोन-चार टेलिव्हीजन चॅनलवर अडकलेले होते. काही ठरावीक कार्यक्रम आणि जाहिरातींवर लोक आनंदी होते. आजही त्या काळातील काही गोष्टी लोकांच्या लक्षात आहेत. आता 90 च्या दशकातील जाहिरांतीबद्दल बोलत आहोत तर निरमा वॉशिंग पावडर जाहिरात सहज आपल्या डोळ्यासमोर येते. याचे जिंगल आजही लोकांच्या ओठांवर आहे.  

 

वॉशिंग पावडर निरमाचे ते गाणे तेव्हाही लोक पुटपुटत होते आणि आजही ते लोकांच्या स्मरणात आहे. तुमच्या लक्षात आले असेल की, निरमा वॉशिंग पावडरच्या पॅकेटवर पांढरा फ्रॉक घातलेली एक मुलगी आहे. पण ही मुलगी कोण हे जाणून घ्यायचा तुम्ही कधी प्रयत्न केलात का? काय आहे त्यामागचे सत्य? तर त्यामागील सत्य आम्ही आपणास सांगत आहोत. 

 

अशाप्रकारे आला पॅकेटवर मुलीचा फोटो

> 1969 मध्ये गुजरातचे करसन भाई यांनी निरमा वॉशिंग पावडरची सुरूवात केली होती. करसन भाई यांना एक मुलगी होती. जिच्यावर ते जीवापाड प्रेम करायचे. त्यांच्या मुलीचे नाव निरूपमा होते पण करसम भाई तिला लाडाने निरमा म्हणायचे. करसन भाई त्यांच्या मुलीला आपल्या नजरेपासून दूर जाऊ देत नव्हते. पण नशीबापुढे कोणाचे काही चालत नाही हेच खरे. 

एक दिवस कुठेतरी जात असताना निरूपमाचे अपघातात निधन झाले. करनस भाईंना या धक्क्यातून सावरण्यास वेळ लागला. करसन भाईंची इच्छा होती की, निरमाने मोठे होऊन नाव कमवावे, पण तिच्या अकाली निधनामुळे त्यांचे हे स्वप्न अपूर्ण राहिले. पण त्यांनी निरमाला अमर करण्याचा दृढनिश्चय केला. त्यामुळे त्यांनी निरमा वॉशिंग पावडरची सुरूवात केली आणि पॅकेटवर निरमाचा फोटो लावला.  

 

पण हा प्रवास इतका सोपा नव्हता कारण त्या काळात मार्केटमध्ये सर्फ सारख्या पावडरचा दबदबा होता. त्याकाळी सर्फचा किंमत 15 रूपये प्रति किलो होती. पण करसनभाई फक्त साडे तीन रूपये दराने निरमाची विक्री करत होते. कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांना निरमा चांगला पर्याय वाटला. त्यानंतर लोक निरमाला ओळखू लागले. 

 

निरमासाठी सोडली सरकारी नोकरी

> करसनभाई सरकारी नोकरी करत होते. दररोज सायकलवर ऑफिसला जाताना रस्त्यात असलेल्या लोकांच्या घरी निरमा वॉशिंग पावडरची विक्री करत होते. त्याकाळी अहमदाबादमध्ये निरमाला चांगली पसंती मिळत होती. करसनभाईंनी तीन वर्षांच्या अथक परिश्रमानंतर या वॉशिंग पावडरचा फॉर्म्युला तयार केला. याला बनवण्यापासून ते विकण्यापर्यंतचे सर्व काम करसनभाई स्वत: करत होते. काही काळानंतर त्यांनी आपल्या नोकरीवर पाणी सोडले आणि निरमावर संपूर्ण लक्ष केंद्रीत केले.   

 

सुरूवातीला केला अडचणींचा सामना

। त्यांनी निरमासाठी एका टीम तयार केली. ती टीम जवळपासच्या दुकानांमध्ये जाऊन निरमाची विक्री करत होते. सुरूवातीला त्यांना काही अडचणींचा सामना करावा लागला. कारण करनसभाईंकडून उधारीवर माल घेणाऱ्या दुकानदारांकडे पैशाची मागणी केल्यावर दुकानदार कारणे सांगून पैसे देण्यास टाळाटाळ करत होते. यामुळे करसनभाईंना तोटा सहन करावा लागत होता.  

 

अशी झाली निरमा जिंगलची निर्मीती
> एके दिवशी त्यांनी संपूर्ण टीमला सांगून मार्केटमधील सर्व निरमा पॅकेट परत मागावले. टीमला वाटले की, करसनभाईंनी हार मानली आणि निरमा आता लवरच बंद होणार आहे. पण करसनभाईंच्या डोक्यात वेगळीच कल्पना होती. त्यांनी निरमाची जाहिरात करण्याचा निर्णय घेतला होता. 

 

> त्यानंतर निरमाची जाहिरात शानदार जिंगलसोबत टीव्हीवर झळकण्यास सुरूवात झाली. निरमाने एका रात्रीत संपूर्ण देशाचे लक्ष आपल्याकडे आकर्षित केले. 'वॉशिंग पावडर निरमा' हे गाणे लोकांच्या ओठांवर आले. निरमाने आता फक्त गुजरातच्या अहमदाबादमध्ये नाही तर देशात स्वत:ची ओळख निर्माण केली.

 

अखरे झाली स्वप्नपूर्ती

> आता करस्नभाईंनी आपल्या मागील चुकांपासून शिकले होते. त्यांना उधारीवर माल देणे बंद केले. हळुहळू त्यांचा सिक्रेट फॉर्म्युला हिट झाला आणि आता त्याचे यश सर्वांसमोर आले आहे. आजही 'वॉशिंग पाउडर निरमा' हे गीत लोकांच्या ओठावर आहे. अखेर करसनभाईंनी निरमाला अमर बनवण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण केले.

बातम्या आणखी आहेत...