Home | Khabrein Jara Hat Ke | truth behind the viral photo of emirats diamong plane

हिऱ्यांनी मढवलेले विमान कधी पाहिले आहे का..? मग हे पाहा.. पण यामागचे सत्य काही वेगळेच आहे..

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 07, 2018, 04:18 PM IST

फोटोखालील कॅप्शन वाचल्यानंतर हा खरा फोटो नसून सारा शकील नावाच्या यूझरने तयार केलेला असल्याचे लक्षात येते.

  • truth behind the viral photo of emirats diamong plane

    हिरा हा एवढा मौल्यवान असतो की, अगदी लहान हिऱ्याची किंमतही कोट्यवधी रुपये असू शकते. मग तुम्ही कधी असा विचार केला आहे का की, एखाद्या खऱ्या खुऱ्या विमानाला पूर्ण हिऱ्यांनी मढवले तर त्याची किंमत काय असेल. नाही ना.. खरं तर असा विचार करण्याची गरजही कधी पडली नसेल. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक फोटो पाहिल्यानंतर मात्र तुम्हाला असा विचार पडल्याशिवाय राहणार नाही.

    एमिरात एअरलाइन्सच्या एका विमानाचा वर दिसणाऱ्या ट्वीटमधला फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये असेलेले विमान हिऱ्यांची मढलेले दिसत आहे. त्यामुळे कंपनीने हिऱ्याचे विमान तयार केले की काय असे वाटल्याशिवाय राहत नाही. पण त्या फोटोखालील कॅप्शन वाचल्यानंतर हा खरा फोटो नसून सारा शकील नावाच्या यूझरने तयार केलेला असल्याचे लक्षात येते. हा फोटो कंपनीने स्वतःच्या प्रमोशनसाठी वापरला आहे.

Trending