आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'सत्य परेशान हो सकता है, पराजित नही हो सकता...', सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर राऊतांची प्रतिक्रीया

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पैसा आणि बलापेक्षा संविधान जास्त ताकदवान आहे- काँग्रेस

मुंबई- सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना विधानसभेत ही बहुमत चाचणी घेण्यास सांगितले आहे. दरम्यान, आज लागलेल्या निर्णयावर शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, सत्याला पराजित करणे अशक्य आहे. त्यांनी ट्वीट केले की, "सत्यमेव जयते" "सत्य परेशान हो सकता है, पराजित नही हो सका..."

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र विधानसभेत आपले बहुमत सिद्ध करण्यासाठी बुधवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी बुधवारीच सभागृहातील सर्व निवडून आलेल्या सदस्यांची शपथ घेतली पाहिजे याची काळजी घेण्याचे निर्देशही त्यांना देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालय असेही म्हणाले की, संपूर्ण कार्यवाही थेट प्रसारित करावी लागेल. विधानसभेत मतदान गुप्त मतदानाच्या आधारे होणार नाही.

पैसा आणि बलापेक्षा संविधान जास्त ताकतवान आहे- काँग्रेस
 
महाराष्ट्र काँग्रेसने मंगळवारी विधानसभेत फ्लोर टेस्ट घेण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केले आणि सांगितले की राज्यघटना "पैसा आणि शक्तीपेक्षा" अधिक शक्तिशाली आहे. आम्ही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत करतोत. तसेच, शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसकडे 162 आमदारांचे समर्थन आहे, त्यामुळे आम्ही सरकार स्थापन करणार.