आरोग्य / चेहऱ्यावरील डागांसाठी करून पाहा हे घरगुती उपाय

मधाच्या वापराने स्किन काही दिवसातच टवटवीत होते. त्वचेवर असलेले डाग मिटवून त्वचा मऊ करण्याचं काम मधाने होतं.

दिव्य मराठी वेब

Sep 17,2019 02:49:22 PM IST

मध : मधाच्या वापराने स्किन काही दिवसातच टवटवीत होते. त्वचेवर असलेले डाग मिटवून त्वचा मऊ करण्याचं काम मधाने होतं.


दूध आणि दुधाचे पदार्थ : दुधात लॅक्टिक अॅसिड असतं. हे त्वचेवरील डाग मिटवण्यास उपयुक्त ठरतं.


हळद : दररोज हळद लावल्याने चेहऱ्यावरील डाग नाहीसे होतात. हळदीत असलेले अॅन्टी बॅक्टेरिअल तत्त्व मुरुम येऊ देत नाही.
अॅलोव्हेरा जेल : या जेलच्या वापराने चेहऱ्यावर पडलेले खड्डे भरण्यास मदत होते. यामुळे मुरुम नाहीसे होण्यास मदत होते.


टोमॅटोचा रस : चेहऱ्यावरील काळे डाग मिटवण्यासाठी टोमॅटोच्या रसात कापसाचा बोळा भिजवून त्या डागांवर लावावं. यामुळे काळे डाग नाहीसे होतील.


लिंबू : लिंबाची सालं त्वचेच्या काळ्या पडलेल्या भागांवर लावा. यामुळे त्वचेचा काळेपणा दूर होतो.


बटाटे : बटाटे उकडून त्याची सालं काढून घ्या. ही सालं चेहऱ्यावर घासल्याने मुरुम नाहीसे होतात.

X
COMMENT