आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केस गळतीवर करून पाहा हे सोपे घरगुती उपाय 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बऱ्याच हर्बल वस्तू आहेत ज्यांच्या प्रयोगामुळे केसांचे गळणे आपण कमी करू शकतो. जाणून घ्या, आयुर्वेदातील पाच सोपे उपाय जे केसांची गळती कमी करू शकतात. 

भृंगराज : मजबूत आणि दाट केसांसाठी आयुर्वेदात भृंगराजचे फार महत्त्व आहे. भृंगराज तेलामुळे टक्कल पडणे कमी तर होतेच, पण अवेळी केस पांढरे होण्यापासूनही बचाव होतो. 

ब्राह्मी : ब्राह्मी आणि दह्याचे पॅक तयार करून केसांवर लावल्याने केसांचे गळणे कमी होते. ब्राह्मीच्या तेलाने नियमित मसाज केल्यामुळेदेखील केस दाट होतात. 

आवळा : आवळ्यात व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर मात्रेत आहे, जे केसांची वाढ करण्यास मदत करतात. आवळ्यात हिना, ब्राह्मी पावडर व दही मिसळून पॅक तयार करून केसांवर लावावे. 

कडूलिंब : कडूलिंबाच्या प्रयोगाने केस फक्त दाटच होत नाही, तर त्यामुळे कोंडा व उवांची समस्यादेखील दूर होते. कडूलिंबाच्या पानांची पावडर तयार करून घ्या. त्यात दही किंवा नारळाचे तेल मिसळून मसाज करायला पाहिजे. 

रिठा : रिठ्याच्या प्रयोगाने केस काळे आणि दाट होतात. रिठा पावडरमध्ये तेल मिसळून डोक्याची मसाज केल्याने केसांची गळती थांबते. 

बातम्या आणखी आहेत...