आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ओठांचा कोरडेपणा घालवण्यासाठी करून पाहा हे सोपे घरगुती उपाय

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

हिवाळ्यात ओठ कोरडे पडतात त्यामुळे ते फाटतात.या समस्यापासून वाचण्यासाठी काही घरगुती उपाय केले तर लवकर फायदा मिळतो. आपण प्रत्येकजण पायाच्या नखापासून ते केसाच्या टोकापर्यंत स्वत:ची काळजी घेतो. आपला चेहरा सुंदर दिसावा यासाठी आपण नेहमी प्रयत्न करत असतो. ओठांमुळे चेहऱ्याचे सौंदर्य आणखी खुलते. मात्र हिवाळ्यात ओठ फाटतात त्यामुळे ओठांचे सौंदर्य टिकवण्यासाठी काही टिप्स-

अॅव्होकाडो
याचा गर ओठाला लावल्याने ओठ नरम पडते. या फळांचा गर काढून तो हाती मॅश करून घ्या. नंतर तो हलक्या हताने ओठावर लावा. ३० मिनिटांपर्यंत ठेवा. त्यानंतर मऊ कापड किंवा कापूस पाण्यात बुडवून ओठ पुसून घ्या. चार-पाच दिवस करा. ओठ सायीसारखे मऊ होतील.

नारळ तेल
ओठांवरील मृत त्वचा काढण्यासाठी खोबरेल तेलात साखर मिसळून हे मिश्रण ओठांवर लावा. त्याचा स्क्रब म्हणून वापर करा. त्यानंतर पाण्याने ओठ स्वच्छ धुऊन आणि त्यावर लिपबाम लावावा. गुलाबजल आणि ग्लिसरीन हे दोन्ही ओठांच्या त्वचेसाठी फायदेशीर असते. यामुळे ओठांवरील मृत त्वचा निघून जाते आणि ओठांचा कोरडेपणा दूर होण्यास मदत होते.

मध
अनेकदा ओठांवर डेड स्किन म्हणजेच मृत त्वचा जमा होते. ही मृत त्वचा नियमितपणे काढावी. ओठांवरील मृत त्वचा दूर करण्यासाठी त्यावर मध लावावा. यामुळे ओठ नरम पडतात. शिवाय ग्रीन टी ऑइलमध्ये अॅन्टी-ऑक्सिडंटचे प्रमाण असते. हे लावल्यास ओठ चमकदार दिसतात.