आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रगतीसाठी टीका सहन करून स्वप्ने साकारण्याचा प्रयत्न करा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अाेडिशा च्या जाजपूर या लहान शहरात १९९६ मध्ये माझा जन्म झाला. आम्ही सहा बहिणी आणि एक भाऊ यासह नऊ जणांच्या दाेन्ही वेळच्या क्षुधाशांतीसाठी वडिलांना खूप मेहनत करावी लागत हाेती. वडील विणकर हाेते आणि तासनतास काम केल्यावर कधी २००, तर कधी ३०० रुपये कमवायचे. जेवणात भात, मीठ आणि भाजलेला बटाटा असायचा. पण बऱ्याचदा ते एकदाच मिळायचे. अशा वेळी आई आखुजी आपल्या वाट्याचे जेवण साेडून झाेपून जात असे, जेणेकरून आई जेवून झाेपली आहे असा विचार करून उरलेले जेवण आम्ही खायचाे. आम्हाला पाेटभर जेवण मिळावे म्हणून गावात लग्नसमारंभ असेल तर आई आमंत्रण नसतानाही पाठवून द्यायची. लहानपणी आम्ही अंडी-चिकनच्या दुकानात काम करायचाे. मेहनताना म्हणून अंडी, भाजी किंवा थाेडेसे चिकन मिळायचे. मी सहा वर्षाची झाल्यानंतर माेठी बहीण सरस्वतीने धावण्यासाठी प्राेत्साहित केले. बूट घेण्याची एेपत नसल्याने अनवाणी धावायचे. दगड, माती लागून पावलांना जखमा व्हायच्या.  त्यामुळे सरस्वतीने पहाटे पहाटे नदीकाठच्या मातीत धावण्याचा सल्ला दिला. मी कडाक्याच्या थंडीत धावण्याचा सराव करायचे. सणासुदीला आई जुनीच साडी नेसायची. नवी साडी का घेत नाही असे बायका विचारायच्या, तर आई म्हणायची ही नवीसारखीच आहे. मला आठवते, आईने कधीही नवीन साडी घेतली नाही. साडीच्या वाचलेल्या पैशातून तिने आम्हा दाेघी बहिणींसाठी बूट आणि टीशर्ट खरेदी केला हाेता. घरी दाेन घास जेवायला नाही अन् चालली मारे मुलींना धावपटू बनवायला.... असे शेजाऱ्यांचे टाेमणे आईला एेकावे लागायचे. मी जरा कुठे नीट धावायला लागले तर आहाराची समस्या निर्माण झाली. वडिलांना माझ्या आहाराचा खर्च परवडत नव्हता. धावपटू हाेण्याची लहानपणापासूनच माझी इच्छा हाेती. हे स्वप्न वास्तवात उतरवण्यासाठी मला खूपच संघर्ष करावा लागला. माझ्या जागी दुसरी काेणी असती तर हारच मानली असती. शालेय जीवनात १०० तसेच २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सलग पदके जिंकत गेली. त्यामुळे आठवीत मला सरकारी हाेस्टेलमध्ये प्रवेश मिळाला. राष्ट्रीय स्पर्धेत पदक जिंकले तर अाेडिशा सरकारकडून शिष्यवृत्ती सुरू झाली. मी १८ वर्षांची झाले तेव्हा लहानपणापासूनचा सुरू असलेला संघर्ष संपणार असे वाटले, पण तसे झाले नाही. त्या वेळचा एक प्रसंग सांगते, २०१४ मध्ये माझ्या शारीरिक चाचणीत पुरुषांमधील टेस्टाेस्टेराॅन हार्माेन्सचे प्रमाण जास्त आढळले. त्यामुळे आयएएएफच्या हायपरेंड्रोजेनिझम धोरणामुळे २०१४ च्या राष्ट्रकुल आणि आशिया गेम्स स्पर्धेत खेळण्यास मनाई केली. माझ्या खेळावर पूर्ण निर्बंध लावण्याबराेबरच भारतीय चमूच्या हाेस्टेललमधून बाहेर काढण्यात आले. पण मी हार मानली नाही आणि वकिलाच्या मदतीने खेळ पंचायतमध्ये दाद मागितली. त्यावेळची तीन-चार वर्षे माझ्यासाठी खूप कठीण हाेती. प्रसार माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यानंतर मी खूप अपमान सहन केला. गावकऱ्यांना वाटले मी मुलगा आहे. त्या वेळी माझे प्रशिक्षक नरेश यांनी बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गाेपीचंद यांच्याकडे माझी शिफारस केली. बंधू गाेपीचंदने मला बॅडमिंटन खेळाडूंच्या हाेस्टेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली व प्रशिक्षण सुरू ठेवण्याचा सल्ला दिला (याच प्रशिक्षणामुळे २०१८ मध्ये मी अनेक पदके जिंकली) आयएएएफने मला उपचार घेण्याचा सल्ला दिला. बराच संघर्ष केल्यावर माझ्या बाजूने निकाल लागल्याने चांगल्यात परिणीती झाली. बंदी उठल्यानंतर १८ व्या आशियाई स्पर्धेत जुलै २०१९मध्ये इटलीमध्ये झालेल्या जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. ट्रॅक अँड फिल्ड इव्हेंटमध्ये सुवर्णपदक जिंकणारी मी एकमेव भारतीय आहे. परंतु २७ सप्टेंबर २०१९ मध्ये दाेहा येथे झालेल्या जागतिक अॅथलेटिक अजिंक्यपद स्पर्धेत मी गुणांची कमाई करू शकले नाही याचे मला दु:ख आहे. मी भारतासाठी खेळत आहे याचा मला अभिमान आहे. याच मे महिन्यात मी आमच्या गावातील एका मुलीबराेबर समलिंगी संबंध असल्याचे मान्य केले तर गदाराेळ झाला. माझी कारकीर्द घडवण्यासाठी त्याने खूप संघर्ष केला, त्यानेच मला मागणी घातली. बाहेरच्यांचा फारसा विराेध झाला नाही, पण माझ्या कुटुुंबाकडून मात्र तीव्र विराेध झाला. कबड्डीपटू आणि माझा आदर्श असलेल्या सरस्वतीने माझ्याविराेधात भूमिका घेतला. २०१८ मध्ये जकार्तामध्ये झालेल्या १८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत २०० मीटरच्या धावण्याच्या स्पर्धेत मला राैप्यपदक मिळाले हाेते. त्याआधी १०० मीटरच्या धावण्याच्या स्पर्धेतही राैप्य मिळाले. या दाेन विजयानंतर अाेडिशा सरकारने मला दीड-दीड काेटी रुपये दिले. त्यातून मी भुवनेश्वरमध्ये क्रीडा अकादमी सुरू करत आहे. २०२० पर्यंत त्यामध्ये प्रशिक्षण सुरू हाेईल. स्वप्ने वास्तवात साकारण्याच्या दृष्टीने विचार केला पाहिजे. पुढील जागतिक अजिंक्यपद अाॅलिम्पिक स्पर्धेत पात्र ठरण्यासाठी मी हैदराबादमध्ये कसून मेहनत करत आहे. (दैनिक भास्कर दिल्लीचे राजकिशोर यांच्याशी त्यांनी केलेल्या बातचितीनुसार) ऑलिम्पिक धावपटू दुती चंद