आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Trying To Save Government In Karnataka: Chief Minister Kumaraswamy Has Left The US Tour And Came In Bangalore

सरकार वाचवण्यासाठी कर्नाटकात प्रयत्न; मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी अमेरिका दाैरा अर्ध्यात सोडून गाठले बंगळुरू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - कर्नाटकात सरकार वाचवण्याचे नाट्य दुसऱ्या दिवशी अधिक तापले. मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी अमेरिका दाैरा अर्धवट साेडून बंगळुरूला परतले. त्यांनी आपल्या जेडीएसच्या अामदारांची बैठक घेतली. यादरम्यान राजीनामा देणाऱ्या १३ अामदारांना काँग्रेसने मुंबईच्या साॅफिटेल हाॅटेलमध्ये पाठवले अाहे.  हाॅटेलमध्ये  भाजप नेतेही पाेहाेचले असून महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी अामदारांशी हाॅटेलमध्ये चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले. 


आम्हाला स्थिर सरकार हवे आहे. त्यामुळे आम्ही १३ आमदारांनी राजीनामे दिले असून निर्णयावर आम्ही ठाम आहोत असे कर्नाटकातील बंडखोर आमदार एस. टी. सोमशेखर यांनी रात्री उशिरा मुंबईच्या वांद्रे परिसरातील सोफिटेल हॉटेलसमोर प्रसारमाध्यमांसमोर बोलताना सांगितले.

 

खरगेंना मुख्यमंत्री करणार?
मल्लिकार्जुन खरगे यांना मुख्यमंत्री केल्यास बंड थंडावेल, असे काँग्रेसच्या एका गटाला वाटते. म्हणूनच सरकार वाचवण्यासाठी कुमारस्वामी खुर्ची साेडू शकतात. याबाबत खरगे यांनी मात्र बाेलण्यास नकार दिला. 

 

...तर बहुमताचा आकडा घटणार
१३ आमदारांचे राजीनामे मंजूर झाल्यास बहुमतासाठी ११३ ऐवजी १०६ जागांची आवश्यकता पडेल. आघाडीचे आमदार १०४ हाेतील. अशा स्थितीत १०५ आमदार असलेला भाजप सत्ता स्थापन करू शकतो.

बातम्या आणखी आहेत...