आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा वसतिगृह १७ सप्टेंबरला सुरू करण्याचा प्रयत्न; ७ संस्थांचे प्रस्ताव, आज सादरीकरण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- राज्यातले दुसरे मराठा वसतिगृह औरंगाबादमध्ये सुरू करण्याच्या प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहे. गेल्या महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांनी एक सप्टेंबरला हे वसतिगृह सुरू करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याला यश आले नाही. आता १७ सप्टेंबरचा मुहूर्त साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने १७ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही शहरात अाहेत. त्यांच्या हस्ते उद््घाटन करण्यासाठी काही राजकीय नेते, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. छावणी कँटोनमेंट भागातील निझाम बंगला येथील जुन्या शासकीय निवासाच्या ठिकाणी हे वसतिगृह सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठीची तयारी अंतिम टप्यात आली असून ६० मुले व ३० मुलींना राहण्याची व्यवस्था तेथे करण्यात येणार आहे. 


७ संस्थांचे प्रस्ताव, आज सादरीकरण 
दरम्यान, वसतिगृह सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी बैठक झाली. त्यास जिल्हाधिकारी उदय चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतुल चव्हाण यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. राजर्षी शाहू महाविद्यालय, राष्ट्रमाता जिजाऊ चॅरिटेबल ट्रस्ट, आधार मतिमंद पुनर्वसन केंद्र, जगद््गुरू तुकाराम प्रतिष्ठान, शांती प्रतिष्ठान, रावसाहेब देशमुख सामाजिक प्रतिष्ठान, वत्सलाबाई सामाजिक शैक्षणिक प्रतिष्ठानने वसतिगृह चालवण्यास तयार असल्याचा प्रस्ताव दिला. बुधवारी याबाबत सादरीकरण होईल, अशी माहिती जाधवर यांनी दिली. 

 

बातम्या आणखी आहेत...