आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Tryst With Destiny World's Premiere Tribeca Film Festival Only Indian Film To Screen

ट्रिबेका फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार 'ट्रिस्ट विथ डेस्टिनी'चा जागतिक प्रीमियर, स्क्रिन होणारा एकमेव भारतीय चित्रपट

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क. प्रशांत नायर यांच्या 'ट्रिस्ट विथ डेस्टिनी' चित्रपटाचा जागतिक प्रीमियर ट्रिबेका फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार आहे. न्यूयॉर्क येथे होणा-या चित्रपट महोत्सवात स्क्रिन होणारा 'ट्रिस्ट विथ डेस्टिनी' हा एकमेव भारतीय चित्रपट आहे. हा महोत्सव 15 एप्रिल ते 26  एप्रिल या कालावधीत चालणार आहे.


आयएएनएसनुसार, इंडो-फ्रेंच प्रॉडक्शनमध्ये तयार झालेल्या या चित्रपटात विनीत कुमार, पालोमी घोष, जयदीप अहलावत, आशिष विद्यार्थी, सुहासिनी मणिरत्नम मुख्य भूमिकेत आहेत. फेस्टिव्हलमध्ये होत असलेल्या चित्रपटाच्या स्क्रिनिंगविषयी आनंद व्यक्त करताना नायर म्हणाले की, ‘आपला चित्रपट ट्रिबेका फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित होणे आमच्यासाठी सन्मानाची बाब आहे.'


चित्रपटाचे निर्माते मनीष मुंदडा म्हणाले की, '' ट्रिस्ट विथ डेस्टिनीचा ट्रिबेकात वर्ल्ड प्रीमियर होत असल्याने आम्ही खूप उत्साहित आहोत. हा आठवडा आमच्यासाठी खूप चांगला राहिला. सर्वप्रथम आमचा 'कामयाब' चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तसेच आमचा एक चित्रपट ट्रिबेका फिल्म फेस्टिव्हलमध्ये पोहोचला.'


हॉलिवूडचे दिग्गज रॉबर्ट डी नीरो, जेन रोजनथल, क्रेग हटकॉफ यांनी 2001 मध्ये ‘ट्रिबेका फिल्म फेस्टिव्हल’ सुरू केला होता.