आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॉक कॉन्सर्ट सुरू असताना त्सुनामी आली तेव्हा, स्टेज फाडून धडकली पाण्याची भिंत; पाहा Video

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जावा - इंडोनेशियात ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर आलेल्या त्सुनामीने शेकडो लोकांचा जीव घेतला. त्यातच त्सुनामीचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. जावा बेटावरील समुद्र किनाऱ्याच्या एका रिसॉर्टमध्ये रॉक कॉन्सर्ट सुरू होते. लोक टाळ्या वाजवून आणि थिरकून एंजॉय करत होते. तेवढ्यात एक जोरदार स्फोट झाला आणि पाण्याची भिंत स्टेजवर धडकली. या लाटेसह एका जहाजाचा ढिगारा सुद्धा स्टेजवर पोहोचला आणि क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. या रॉक बँडचा लीड सिंगर रीफिअन फजारसिया याने आपल्या इंस्टाग्रामवर एक इमोशनल व्हिडिओ शेअर केला. तसेच त्या महाप्रलयात बँडचे दोन कलाकार मृत्यूमुखी पावल्याचे सांगितले. ही संपूर्ण घटना मोबाईल व्हिडिओमध्ये कैद झाली असून तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर पसरवला जात आहे.


इंडोनेशियात रविवारी सकाळी त्सुनामीच्या तांडवात किमान 220 जणांचा मृत्यू झाला. शेकडो जण बेपत्ता असून 600 लोक जखमी आहेत. सर्वात कुप्रसिद्ध ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर समुद्राच्या लाटा उसळल्या आणि त्सुनामीने अख्खी घरे वाहून नेली. या जलप्रलयात शेकडो इमारती जमीनदोस्त झाल्या. दक्षिण समुत्रा येथील तटवर्ती भागासह जावा बेटाला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाने दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार, शनिवारी दुपारी 2.30 वाजता (भारतीय वेळेनुसार शनिवारी रात्री 9.30 वाजता) हा महाप्रलय आला.

 

बातम्या आणखी आहेत...