आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

3 वर्षांपूर्वी
 • कॉपी लिंक

मंगळवार 10 डिसेंबर रोजी कृत्तिका नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. यासोबतच आजची ग्रहस्थिती शिवा नावाचा शुभ योग तयार करत आहे. या शुभ योगाचा फायदा 12 पैकी 7 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. शुभ योगाच्या प्रभावाने करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. नशिबाची साथ मिळू शकते. पैशाशी संबंधित अडचणी नष्ट होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...

 • मेष: शुभ रंग : अबोली | अंक : २

समोरच्या व्यक्तीवर तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्वाचा प्रभाव राहील. सभासंमेलनात तुमचे वक्तृत्व प्रभावी होईल. काही रखडलेली येणी वसूल होऊ शकतील.

 • वृषभ: शुभ रंग : हिरवा | अंक : ८

आर्थिक प्रश्न दुपारनंतर सुटणार आहेत. दुरावलेल्या हितसंबंधात सुधारणा होईल. आपल्या स्पष्टवक्तेपणा मुळे कुणी दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या.

 • मिथुन : शुभ रंग : क्रिम | अंक : ४

खिसे भरलेले असले तरीही दुपारनंतर रिकामे व्हायला वेळ लागणार नाही. आवक पुरेशी असली तरी बचतीस प्राधान्य देणे गरजेचे आहे. प्रवास घडण्याची शक्यता. 

 • कर्क : शुभ रंग : मोतिया | अंक : ३

महत्वाकांक्षी उपक्रमाची सुरवात करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवासायिक नवे करार यशस्वी होतील. यश हाकेच्या अंतरावर आल्याचे जाणवेल.

 • सिंह : शुभ रंग : पिस्ता | अंक : ४

आज निस्वार्थीपणे काही कंटाळवाणी कामेही करावी लागणार आहेत. आज फक्त कर्तव्यास प्राधान्य द्याल.मित्रमंडळींना आज दुरुनच राम राम करणे हिताचे.

 • कन्या : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ५

आर्थिक अंदाज कोलमडणार आहेत. हातचे सोडून पळत्याच्या मागे लागायचा मोह अंगाशी येईल. प्रतिष्ठा धोक्यात येऊ शकते. प्रलोभनांपासून जपायला हवे.

 • तूळ : शुभ रंग : राखाडी | अंक : ९

व्यावसायिक मोठे आर्थिक व्यवहार व विवाह जुळवण्या विषयी चर्चा  दुपारपूर्वीच  करा. वैवाहीक जिवनांत आज तु म्हणशील तसंच हे धोरण ठेवा. 

 • वृश्चिक : शुभ रंग : पांढरा | अंक : ७

वैवाहीक जिवनांतील वाद दुपारनंतर मिटतील. महत्वाच्या वाटाघाटी यशस्वी होतील. योग्यवेळी घेतलेले निर्णय योग्य ठरतील. कष्टांचे फळ मिळेल. 

 • धनू : शुभ रंग : चंदेरी | अंक : १

कार्यक्षेत्रात प्रगती पथावरुनच तुमची वाटचाल चालू आहे. हितशत्रूंवर मात्र करडी नजर असूद्या. आज दुपारनंतर जरा तब्येत नरम राहील. योग्य सल्ला घ्या.

 • मकर : शुभ रंग : गुलाबी | अंक : ३

काही कौटुंबिक कटकटीतून दुपारनंतर उसंत मिळेल.आज प्रिय व्यक्तीस दिलेला शब्द पाळावा लागेल. आज  मुलांचेही लाड आनंदाने पुरवाल. छान दिवस. 

 • कुंभ : शुभ रंग : भगवा | अंक : ६

व्यावसायिक उद्दीष्ठे पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम करण्याची तुमची तयारी असेल. रिकाम्या गप्पांत वेळ दवडून चालणार नाही. योग्य जाहिरातही गरजेची आहे.   

 • मीन : शुभ रंग : मरून | अंक : २

आज काही अनुकूल घटनांनी तुमचं मनोबल वाढेल.काही अनपेक्षित लाभ होतील. नेते मंडळींची भाषणे प्रभावी होतील. साहित्यिक मंडळींची उत्स्फुर्तता वाढेल.

बातम्या आणखी आहेत...